लायन्स क्लब बार्शी टाऊनच्या अध्यक्षपदी अमित इंगोले, सचिवपदी महावीर कदम

बार्शी: बार्शीच्या सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व युवकांचा क्लब म्हणून ओळखले जाणार्‍या लायन्स क्लब बार्शी टाऊनच्या अध्यक्षपदी वास्तुविशारद अमित इंगोले,    सचिवपदी उद्योजक महावीर कदम तर खजिनदारपदी भूषण कदम यांची निवड करण्यात आली. 

आगामी वर्षासाठीची क्लबची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून यामध्ये अध्यक्ष अमित इंगोले, सचिव महावीर कदम, खजिनदार भूषण कदम, सहसचिव प्रीतम सुरवसे, सहखजिनदार प्रवीण कसपटे तर कार्यकारिणी सदस्यपदी अ‍ॅड. वासुदेव ढगे, उमेश चौहान, अजित देशमुख, अमित कटारिया, राजाभाऊ काळे, निलेश जैन, रवीप्रकाश बजाज, डॉ. शरद पाटील, अ‍ॅड. सागर हाजगुडे, अतुल सोनिग्रा, आनंद पुनमिया, प्रकाश फुरडे, अभिजित पाटील, डॉ. प्रदीप जाधव तर संचालक मंडळात युवराज कादे, संतोष ढाकणे, डॉ. नवदीप लोकरे, प्रशांत नवले, डॉ. केवल्य गायकवाड, विनोद बुडूख यांचा समावेश आहे.

लायनेस क्लबच्या अध्यक्षपदी डॉ. गौरी गायकवाड तर सचिवपदी शीतल जैन यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यकारिणीमध्ये सुदर्शना सुराणा, जयश्री ढगे, मालती पवार, क्षमा पाटील, प्रज्ञा हाजगुडे, काजल चौहान, विद्या काळे, स्मिता देशमुख व शर्वरी फुरडे यांची निवड केलेली आहे.

क्लबचा पदग्रहण सोहळा शनिवार दि. 6 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता रामकृष्ण हॉटेल येथे होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्रांतपाल प्राचार्य प्रबुद्धचंद्र झपके असणार आहेत. यावेळी नगराध्यक्ष असिफ तांबोळी, डॉ. शिरीष कुमठेकर, रिजन चेअरमन राजशेखर कापसे व झोनल चेअरमन गहिणीनाथ कदम उपस्थित राहणार आहेत.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठीचे फेसबुक पेज लाईक करा.
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा

ग्लोबल न्युज नेटवर्क: