लढा कोरोनाशी: मंत्री जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्री निधीला एक महिन्याचे नव्हे तर एवढ्या महिन्यांचे वेतन देणार

लढा कोरोनाशी: मंत्री जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्री निधीला एक महिन्याचे नव्हे तर एवढ्या महिन्यांचे वेतन देणार

कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सार्वजनिक आरोग्य व आर्थिक परिस्थिती धोक्यात आली आहे. अशा संकटाच्या काळात राज्य शासनाने सर्व लोकप्रतिनिधींच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर आपल्याला एकाही महिन्याचे वेतन न देता या वर्षीचा संपूर्ण पगार हा राज्याच्या तिजोरीत जमा करण्यात यावा, अशी घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री ना. जितेंद्र आव्हाड यांनी केली.

तसेच त्यांच्यासह त्यांचा वाहन चालक व पीए यांचेही वेतन सरकारी तिजोरीत जमा करावे आणि गरजूंच्या व महाराष्ट्राच्या कल्याणासाठी वापरावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

आजच दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधीमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात 60 टक्के कपात करुन त्यांना 40 टक्के वेतन देण्यात येणार आहे. राज्यातील ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात 50 टक्के कपात करण्यात आली असून त्यांना निम्मे वेतन देण्यात येणार आहे.

‘क’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांना 75 टक्के वेतन मिळेल. ‘ड’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. राज्य शासकीय अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले होते.

Jitendra Awhad

Corona #CorinaVirusUpdate #कोरोनाशीलढा #MaharashtraAgainstCorona #LetsFightCoronaTogether

ग्लोबल न्युज नेटवर्क: