राष्ट्रवादी सोडणाऱ्यांना जयंत पाटील यांनी केले हे चॅलेंज!

मोहोळ: जर कुणाची बुद्धी फिरली आणि पक्ष सोडला तर त्यांना विधानसभेत पोहचू देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेले जाणारे यांना मोहोळ च्या जाहीर सभेत दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचे मोहोळ तालुक्यात जोरदार स्वागत करण्यात आले त्यानंतर मोहोळ येथे जंगी सभा पार पडली.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून जाणार्‍या लोकांचा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चांगलाच समाचार या सभेत घेतला.स्वःता केलेली दुशकृत्य झाकण्यासाठी मुख्यमंत्री फडवणीस यांच्या पायावर जावुन काही मंडळी  पडत आहे . जे जात आहेत त्यामुळे आमचा पक्ष स्वच्छ होत आहे. पुन्हा एकदा सत्ता तरुणांच्या हातात देण्याचा प्रयत्न होणार आहे. शरद पवार साहेबांनी तरुणांना दिलेली ताकद हीच आहे नोटबंदीमुळ देशाची  अर्थव्यवस्था संकटात आली आहे . भारतातल्या मोठमोठया कंपन्या बंद पडत आहेत . मोहोळच्या विधानसभेत राजन पाटील , बळीराम साठे , यांच्यासह राष्टवादीचे पदाधिकारी जो उमेदवार निवडतील तोच  उमेदवार राहील असे सांगीतले .
सुर्याजी पिसाळांच्या अवलादींशी कसं वागायचं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले होते तोच धडा गिरवत सुर्याजी पिसाळांशी दोन हात करण्यास जनता सज्ज झाली आहे असे पाटील यांनी सांगितले.

तसेच लोकसभेत जे केलात तसंच विधानसभेत केलात तर जनता तुमचं स्वप्न पूर्ण होवू देणार नाही – खासदार डॉ. अमोल कोल्हे

लोकसभेत काय झालं ते सर्वांना ठाऊक आहे. आता विधानसभेत जर तसंच केलात तर राज्यातील जनता तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण होवू देणार नाही हे लक्षात ठेवा असा निर्वाणीचा इशारा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना दिला. पुढील २५ वर्षे आमचीच सत्ता येणार असे मुख्यमंत्री सांगत आहेत परंतु मोहोळमध्ये उसळलेल्या या जनसागराची दखल तुम्हाला घ्यावीच लागेल असे मुख्यमंत्र्यांच्या विधानावर बोलताना खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले.

या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अमोल मेटकरी, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपले विचार मांडले. जिल्हा परिषद सदस्य बाळराजे पाटील राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली चार किलोमीटरची भव्य मोटारसायकल रॅली काढत मोहोळ तालुका राष्ट्रवादीच्यावतीने शक्तीप्रदर्शन करण्यात आले.शिवस्वराज्य यात्रेचा आजचा नववा दिवस असून दुसरी सभा सोलापूर जिल्हयातील मोहोळ येथे पार पडली.

या सभेला राष्ट्रवादी विदयार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, माजी आमदार राजन पाटील, लोकनेते शुगर चे अध्यक्ष बाळराजे पाटील,जिल्हाध्यक्ष दिपकआबा साळुंखे, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर आदींसह पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: