आम्हाला राजन पाटलांची माफी मागायचीय ! जयंत पाटील

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघ अनुसुचित जातीसाठी राखीव झाल्यापासून मागील दोन निवडणुकात पक्षाने दिलेले  लक्ष्मणराव ढोबळे व रमेश कदम हे उमेदवार माजी आमदार राजन पाटील यांच्यामुळे विजयी झाले. आज हे दोन्ही आजी-माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत नाहीत. मागील दोन निवडणुकीचा अनुभव पाहता आम्हाला मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांची माफी मागावी लागेल, असे सांगत यंदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असावा याचा निर्णय माजी आमदार राजन पाटील व बळीराम काका साठे यांनी घ्यावा असे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

‘शिवस्वराज्य यात्रा’ आज मोहोळमध्ये आल्यानंतर शिवाजी चौकात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, जिल्हा परिषद सदस्य बाळराजे पाटील, जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, जिल्हा कार्याध्यक्ष बळीराम साठे, महीला आघाडीच्या निर्मला बावीकर, प्रदिप गारटकर ,  माजी आमदार राजन पाटील पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील , लोकनेते कारखान्याचे चेअरमन  बाळराजे पाटील  , तालुका अध्यक्ष प्रकाश चवरे, नगराध्यक्षा वंदना सुरवसे , युवकचे जिल्हा अध्यक्ष विक्रांत माने, राष्टवादीचे  प्रदेश सरचिटणीस रमेश बारसकर , सुरज चव्हाण  ,जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील , माजी उपसभापती मानाजी माने , जिपचे माजी अध्यक्ष बळीराम साठे ,अॅड सुनिल रावडे , एजाज     तलफदार  ,राहुल क्षिरसागर ,  संकेत ढवळे , नानासाहेब डोंगरे ,भारत सुतकर , तालुका उपाध्यक्ष  हेमंत गरड , सारीका नाईकवाडे  , प्रशांत बचुटे , उपस्थित होते .

प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांना या मतदारसंघातून पंधरा हजारापेक्षा अधिक मताधिक्‍य मिळाल्याने आगामी निवडणूक राष्ट्रवादीकडून लढण्यासाठी जवळपास 35 ते 36 जणांनी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे पाटील व साठे जो उमेदवार देतील तो पक्ष फायनल करेल.

खासदार अमोल कोल्हे म्हणाले,शिवस्वराज्य यात्रेत भगवा पाहून अनेकांच्या पोटात दुखते आहे . याच भगव्याच्या नावाने जाती धर्मात तेढ निर्माण केली जात आहे . परंतू  भगवा कोणाची मालकी नाही . जेवढा भगवा तुमचा तेवढा आमचा पण आहे . जिल्ह्यात अनेक उलथापालथ होत आहेत .  कोण कशासाठी गेले हे त्यांनाच माहीत  , झाडावरून पानगळ झाली की झाडाने त्याचा विचार करायचा नसतो पानाने त्याचं त्यांनाच बघायचं असतं पानान केरात  जायचं की चुलीत  जायचं हे त्यानच ठरवायच असत असे सांगत इकडून तिकडे उड्या मारणाऱ्यानी   विचार करावा . सोलापूर जिल्ह्यातील एखादा दुसरा बुरुज ढासळल्याने किल्ला पडत नसतो असेही खासदार कोल्हे शेवटी बोलताना म्हणाले.

माजी आमदार राजन म्हनाले  राज्यात कसलेही वारे आले तरी मोहोळ तालुक्यात राष्टवादीचाच उमेदवार विजयी होईल .मोहोळ तालुका  ईडी व सीबीआयच्या   चौकशीला घाबरणारा तालुका  नाही . आमच्या तालुक्यात अनाजी पंत कोणी नाही असे सांगत आबा तुम्ही आता सांगोल्यातले आनाजी पंत बाजुला काढा असा सल्ला दिला . मालक विकत घेईन म्हणनाऱ्याला शुभेच्छा अनगरला बघुन घेतो म्हणनाऱ्याला शुभेच्छा , कारण संस्काराचा अभाव असनारी मंडळी अस बोलतात . आता या वेळेस  उमेदवार देताना मात्र खरा सालगडी असणारा उमेदवार दया अशी मागणी   राजन पाटील यांनी यावेळी केली .

 माहिलाना स्थानबद्ध करणार असल पळपुट सरकार पाहील नव्हत . महाजनादेश कार्यक्रमाला विज चोरी करुन काम करणारी ही मंडळी असल्याचा आरोप करित पक्ष सोडुन जाणाराना श्रध्दांजली असे चाकणकर म्हणाल्या.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: