राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी मेहबूब शेख तर कार्याध्यक्ष पदी सूरज चव्हाण व रविकांत वरपे

ग्लोबल न्युज नेटवर्क : लोकसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने नव्याने पक्ष बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. मागील तीन महिन्यांपासून रिक्त असलेल्या राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या  महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी मेहबुब शेख यांची निवड करण्यात आली आहे, तर कार्याध्यक्षपदी सुरज चव्हाण व रविकांत वरपे यांना संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे.


राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष असणारे संग्राम कोते-पाटील यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी पदाचा राजीनामा दिला होता, त्यामुळे लोकसभेपूर्वीच नवीन चेहऱ्याला अध्यक्षपदी संधी दिली जाणार असल्याची चर्चा होती, मात्र आता लोकसभा निवडणुकीमध्ये सपाटून पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर युवकांची फळी सांभाळण्याची जबाबदार मेहबुब शेख यांच्यावर सोपवण्यात आली आहे.शेख हे बीड जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

admin: