राष्ट्रवादी चे आमदार जयदत्त क्षीरसागर आज हातात बांधणार शिवबंधन :मातोश्रीवर करणार सेनेत प्रवेश, वाचा सविस्तर

बीड | लोकसभा निवडणुकांचे मतदान संपले आहे. अवघ्या काही तासातच निवडणुकांचे निकाल हाती येणार आहे. दरम्यान राजकीय घडामोडींना चांगलच वेग आला आहे. विधानसभांचे तयारीही राज्यात सुरू झाल्याचे चित्र आहे. अशीच काहीशी परिस्थिती बीड जिल्ह्यात देखील आता पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते माजी मंत्री आमदार जयदत्त क्षीरसागर यांना, त्यांचे पुतणे संदिप क्षीरसागर यांनी पक्षातच अडचणीत आणल्यामुळे त्यांनी आता शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आज ते मातोक्षीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे. तर सायंकाळी पाच वाजता ते पत्रकारांशी संवाद साधणार आहे. यामुळे बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप आला आहे.

बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभेचे एकमेव आमदार म्हणून जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे पाहिलं जात. त्यांच्या राजकीय प्रवासात ते आजपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत निष्ठांवंत राहिले. परंतु बीड नगर पालिका निवडणुकीपासून त्यांचं घर फुटलं. क्षीरसागर कुटुंबात जयदत्त क्षीरसागर एक गट तयार झाला तर पुतणे संदीप क्षीरसागर यांचा दुसरा गट तयार झाला. यामुळं जयदत्त क्षीरसागर यांची डोकेदुखी वाढली होती. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी पक्षाकडून पुतणे संदीप क्षीरसागर यांना ताकत दिली जात होती, तर आ. क्षीरसागर यांचं खच्चीकरण होत असल्याचे दिसले.

राष्ट्रवादीच्या हल्लाबोल सभा बीड जिल्ह्यात 6 ठिकाणी झाल्या मात्र पक्षाचे एकमेव आमदार असलेले क्षीरसागर एकाही सभेला उपस्थित नव्हते, एवढचं काय तर त्यांचा सभेच्या बॅनरवर देखील फोटो नव्हता. यामुळं क्षीरसागर बंधूंनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत, विकासकामांच्या माध्यमातून चांगलीच जवळीक साधली. मुख्यमंत्री फडणवीसांसोबत हेलिकॉप्टर मधून बीडमध्ये केलेली एन्ट्री चांगलीच चर्चेचा विषय बनली होती. तर वर्षावर केलेल्या गणपती आरतीने त्यात भर टाकली. काही दिवसांपूर्वी क्षीरसागर बंधूंनी फडणवीस यांच्या उपस्थितीत बीडमध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ देखील केला होता.

जयदत्त क्षीरसागर यांचा राजकीय प्रवास

जयदत्त क्षीरसागर 1995 च्या विधानसभा निवडणूकीत उतरले होते. मात्र त्यांना 41 हजार 41 मते मिळाली आणि येथून शिवसेनेचे प्रा.सुरेश नवले 67 हजार 732 इतक्या प्रचंड मतांनी निवडून आले होते. त्यानंतर 1999 मध्ये जयदत्त क्षीरसागर हे चौसाळ्यामधून निवडणूक लढले. यावेळी त्यांना 44 हजार 776 मते मिळाली आणि ते चौसाळ्यातून आमदार झाले. दरम्यानच्या निवडणूकीत दिवंगत केशरकाकू क्षीरसागर यांनी बीड विधानसभा मतदार संघातून सय्यद सलीम यांना उभे केले होते. बीडमधून सय्यद सलीम 44 हजार 978 मते घेवून विजयी झाले होते. यावेळी शिवसेनेचे उमेदवार प्रा.सुनिल धांडे यांना 41 हजार 802 मते घेवून पराभव पत्कारावा लागला होता. 2004 साली बीडमधून शिवसेनेचे प्रा.सुनिल धांडे 86 हजार 581 मते घेवून निवडून आले होते. तर चौसाळ्यातून आ.जयदत्त क्षीरसागर यांना 75 हजार 62 मते घेवून पराभव स्विकारावा लागला होता.

तर चौसाळा मतदार संघातून भाजपचे केशवराव आंधळे यांनी 78 हजार 439 मते घेेवून विजय मिळविला होता. 2009 विधानसभा निवडणूकीत जयदत्त क्षीरसागर यांनी 1 लाख 91 हजार 63 इतकी प्रचंड मते घेवून विजय मिळविला. दरम्यान, शिवसेनेचे प्रा.सुनिल धांडे यांना येथे पराभव पत्कारावा लागला. 2014 च्या निवडणूकीतही जयदत्त क्षीरसागर यांनी विक्रमी मते घेवून विजय खेचून आणला. मात्र सहा महिन्याने होवू घातलेल्या निवडणूकीत आता ते राष्ट्रवादीकडून निवडणूक लढणार नाहीत, असेच हे चित्र बीड मतदार संघात शिवसेनेचे आपले हक्काचे मतदान आहे. जयदत्त क्षीरसागर यांचेही आपले हक्काचे मतदार बीड विधानसभा मतदार संघात आहे. या दोन्हीची तुलना करता आणि आ.जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश करुन ही विधानसभा निवडणूक लढवली तर बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर यांच्याशिवाय दुसरा आमदार होवूच कसा शकतो. जयदत्त क्षीरसागरांनी आज मराठी नववर्षाच्या पुर्वसंध्येला आवळलेली वज्रमुठ त्यांचे पुतणे संदिप क्षीरसागर यांच्यासाठी धोक्याची असून जयदत्त क्षीरसागर यांच्या पक्षीय वजाबाकीची ही दणदणीत बेरीज आहे. या बेरजेची गुढी त्यांचे बंधू नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांच्यासाठी लकी ठरेल यात शंका नाही. कारण पुतण्याच्या मनस्थापनाने वैतागलेले जयदत्त क्षीरसागर मुद्दामहून भावाला विधान परिषदेची आमदारकी देतील यात शंका नाही. अशी चर्चा बीड मध्ये दबक्या आवाजात पाहायला मिळत आहे.

admin: