राष्ट्रवादी काँग्रेस सर्व आमदार खासदारांचे महिन्याचे वेतन देणार कोरोनाग्रस्तांना

राष्ट्रवादी काँग्रेस सर्व आमदार खासदारांचे महिन्याचे वेतन देणार कोरोना ग्रस्तांना

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. ह्या जागतिक महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी सारखी पावले उचलावी लागल्याने लोकांचा रोजगार बुडाला असून शेती व उद्योगधंद्यांवर देखील मोठे संकट ओढवले आहे. या अभूतपूर्व संकट काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेसोबत ठामपणे उभा आहे.

एक सामाजिक जबाबदारी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्य व केंद्राच्या सदर सहाय्यता कार्यास हातभार लागावा या हेतूने राज्य विधिमंडळातील विधानसभेचे व विधान परिषदेचे सदस्य यांचे एक महिन्याचे वेतन ‘मुख्यमंत्री सहायता निधी’साठी तसेच संसदेतील लोकसभा व राज्यसभा सदस्यांचे एक महिन्याचे वेतन ‘प्रधानमंत्री सहायता निधी’साठी देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. सदस्यांना कळविण्यात येते की सदर धनादेश प्रदेशाध्यक्ष श्री. जयंतराव पाटील यांचेकडे पुढील कार्यवाहीसाठी जमा करावेत.अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व सदस्यांना दिले आहेत.

यापूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीकडून कोरोना व्हायरसविरोधात लढा देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. रिलायन्सकडून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 5 कोटींची मदत जाहीर केली आहे. तसेच रिलायन्सकडून दररोज एक लाख मास्क तयार करण्यात येत आहे.

रिलायन्स व महानगर पालिकेने एकत्रितपणे सेव्हन हिल्स रुग्णालयात 100 खाटाचे विलगीकरण कक्ष तयार केला आहे. रिलायन्स फाऊंडेशनतर्फे विविध एनजीओला जेवण पुरवले जाणार आहे. महाराष्ट्र लोढीवली येथे आयसोलेशन सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: