राष्ट्रवादी काँग्रेसची 77 उमेदवारांची पहिली यादी जाहीर;वाचा सविस्तर-

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसनेही अखेर पहिली यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांना कर्जत जामखेडमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

परळीतून धनंजय मुंडे, इंदापूरमधून दत्तात्रय भरणे, इस्लामपूरमधून जयंत पाटील या नेत्यांची नावं या यादीत आहेत. या यादीत एकूण 77 उमेदवारांचा समावेश आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसची इतर मित्रपक्षाची आघाडी आहे. आघाडीतील जागावाटपानुसार 125-125 जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादी तर 38 जागांवर मित्रपक्ष लढणार आहेत. त्यानुसार राष्ट्‌वादीने आज एकूण 77 मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: