काँग्रेसची 20 जणांची तिसरी यादी जाहीर; अक्कलकोट मधून आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांना पुनः संधी

काँग्रेसची 20 जणांची तिसरी यादी जाहीर; अक्कलकोट मधून आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांना पुनः संधी

मुंबई, 03 ऑक्टोबर : काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्य विधानसभेसाठी तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 20 जागांसाठी उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.

आतापर्यंत काँग्रेसने 120 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने मध्य नागपूर मतदारसंघातून बंटी शेळके यांना तर पूर्व नागपूर मतदारसंघातून पुरुषोत्तम हजारे यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने दुसऱ्या यादीमध्ये एकूण 52 उमेदवारांची यादी जाहीर केली होती.

या यादीमध्ये कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाण, नागपूर दक्षिण मधून गिरीष पांडव यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर लातूरमधून दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा धीरज देशमुख यांनाही उमेदवारी जाहीर झाली आहे. पहिल्या यादीत अमित देशमुख यांना लातूर शहरातून उमेदवारी जाहीर झाली आहे.


::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: