राष्ट्रवादी काँग्रेसचा हा ज्येष्ठ नेता म्हणतो,मला सर्वच पक्षातून प्रवेशासाठी ऑफर, राष्ट्रवादी ला आणखी एक धक्का बसणार?

मला सर्वच पक्षातून प्रवेशासाठी आॅफर, मी कोणत्या पक्षामुळे नव्हे तर बार्शीकरांच्या प्रेमामुळे आमदार झालो- आमदार दिलीप सोपल ,पिंपरी चिंचवडमध्ये घेतला बार्शीकरांचा मेळावा

बार्शी – गेली 35 वर्षे संसदीय राजकारणात मी सक्रीय आहे. मला घर प्रपंच नसल्यानं, लोकांच्या गाठीभेटी आणि त्यांची कामं हाच माझा उद्योग आहे. मला पक्षप्रवेशासाठी सर्वच राजकीय पक्षातून आॅफर आहेत,त्यामुळे त्या संदर्भात आपले मत विचारात घेण्यासाठी मी आलोय असे सांगत मी कोणत्या पक्षामुळे नव्हे तर बार्शीकरांच्या प्रेमामुळे आमदार झालोय असे स्पष्ट प्रतिपादन आ़ दिलीप सोपल यांनी केले.

सोलापूर मराठवाडा मित्र मंडळ,बार्शीकर मित्र मंडळ, पिंपरी चिंचवड आयोजित स्नेह मेळाव्यात आमदार सोपल बोलत होते. यावेळी अध्यक्ष प्रशांत जाधव, उद्योजक हनुमंत गटकळ, हेमंत गडशिंग, भाऊसाहेब कोकाटे, फफाळ आदी उपस्थित होते़ आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोपल यांनी थेट पिंपरी चिंचवड येथून प्रचाराला सुरुवात केली. यावेळी, महाराष्ट्रात पसरलेल्या बार्शीकरांना मी भेटत असतो, त्यांची प्रगती पाहून आनंद होतो, असे सोपल यांनी म्हटले.

पाणीपुरवठा मंत्री असताना राज्यातील साडे तीन हजार पाणीपुरवठा योजना मार्गी लावल्या़ मात्र, कुठल्याही आर्थिक अपेक्षेशिवाय हे सर्व केले़ विरोधीपक्षांवर टिका करताना मी कुठल्याही कामासाठी टक्केवारी किंवा हिस्सा घेणारा नाही. म्हणजेच त्या कामाची साईझ कमी करणारा, त्यात भ्रष्टाचार करणारा नेता नाही असे सोपल यांनी म्हटलं.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच सर्वच पक्षातून मला आॅफर आहेत. मात्र, आपलं मत विचारात घ्यायला मी आलोय. मी कुठल्याही पक्षामुळे आमदार बनलो नसून, बार्शीकरांच्या प्रेमामुळे आमदार झालो आहे. म्हणूनच दोनवेळा अपक्ष निवडून आलो. त्यामुळे, कार्यकर्ता आणि जनमत चाचपणी करूनच आपण निर्णय घेऊ, असेही सोपल यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सोपल यांचे कार्यकर्ते जय महाराष्ट्र असे म्हणत शिवसेना प्रवेश फिक्स झाल्याचं सुचवत आहेत. या कार्यक्रमातही सोपल यांनी आपल्या खास शैलीत विनोदी फटकेबाजी केली़यावेळी सर्वच कार्यकर्त्यांनी सोपल हाच आमचा पक्ष असून तुम्ही जो निर्णय घ्याल तो मान्य असल्याचे सांगीतले.

तर माझा ही जय महाराष्ट्र…

पिंपरी चिंचवडला आ़ सोपल हे मेळावा घेत असताना त्यांच्या निवासस्थानी आ़सोपल यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या अनुपस्थितीत विरोधीपक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली़ त्यामध्ये शिवसेना प्रवेशासंदर्भात विचारविनीमय झाला़ यावेळी बहुसंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा असा विचार मांडला़ शेवटी आ़ सोपल यांना फोन लावला हा विचार सांगीतला तेंव्हा तिकडून सोपल यांनी तुम्ही जय महाराष्ट्र म्हणत असाल तर मी ही जय महाराष्ट्र म्हणतो़ असे शिवसेना प्रवेशाला अधिकृत दुजोराच दिला.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा

ग्लोबल न्युज नेटवर्क: