मुंबई; राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. प्रवेश केलेल्या अनेक नेत्यांना विधानसभेचे तिकीट हवे आहे. मात्र जे नेते विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत त्याना संघटनेत पदे दिली जात आहेत.
राष्ट्रवादीचे कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडीक यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी तर चित्रा वाघ यांची मुंबईच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी या नियुक्त्या जाहीर केल्या.
चित्रा वाघ या राष्ट्रवादीच्या मुंबई महिला अध्यक्ष होत्या. विविध कार्यक्रमांमध्ये त्या पक्षाची भूमिका आक्रमक पणे मांडायच्या. पण काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करुन भाजपामध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक बडे नेते, पदाधिकारी यांनी अलीकडे भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आजच्या नियुक्त्यांवरुन त्यांना मोठी पदे मिळाल्याचेही दिसत आहे.
चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्याबद्दल संपर्क अभियान व जनजागरण अभियानासाठी समितीही नेमली आहे.
=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.