मुंबई । विधानसभा निवडणूक 2019 साठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. इतर पक्षाच्या तुलनेत राष्ट्रवादीने आपली पहिली यादी ही काहिशी उशिरा जाहीर केली होती.
राष्ट्रवादीने आपल्या पहिल्या यादीत एकूण 77 जणांच्या नावाची घोषणा केली आहे. दुसऱ्या यादीत 20 जणांच्या नावाची घोषणा केली आहे. भाजप-शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या यादीत या बंडखोरांना मोठ्या प्रमाणात संधी दिली जाईल, अशी अटकळ बांधली जात होती.
मात्र, पक्षातील निष्ठावंत घराणी व आजी-माजी आमदारांना उमेदवारी देत राष्ट्रवादीने नवे वाद टाळण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक तरुण व नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याने त्यांनी भाजप व शिवसेनेसमोर कडवे आव्हान उभे केले आहे.
माढा येथून बबन शिंदे तर माळशिरस येथून उत्तम जानकर यांना तिकीट देण्यात आले आहे.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi