राणा जगजीतसिंह पाटील तुळजापूर मधून लढणार, आर टी देशमुखां ऐवजी आडसकरांना संधी

औरंगाबाद : भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या यादीत मराठवाड्यातील १७ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. त्यात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह पंकजा मुंडे, संभाजी पाटील निलंगेकर, बबनराव लोणीकर व अतुल सावे या मराठवाड्यातील तीनही मंत्र्यांना  पुन्हा संधी मिळाली आहे.विद्यमान आमदारांपैकी आर टी देशमुख यांना वगळून त्यांच्या जागी रमेश आडसकरांना संधी मिळाली आहे.

वयाचे कारण समोर करून तिकीट मिळणार कि नाही अशी शंका उपस्थित केले जाणारे हरीभाऊ बागडे यांनीही तिकीट मिळविले. तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेल्या राणा जगजितसिंह पाटलांनाही उमेदवारी मिळाली आहे. त्याना उस्मानाबाद-कळम्ब मधुन मिळेल असे वाटत होते. परंतु सेनेचे आणि त्यांचे न जुळल्याने त्याना तुळजापूर मधून लढावे लागणार आहे.

पहिल्या यादीत औरंगाबाद, लातूर आणि जालन्यातून प्रत्येकी तीन, बीडमधील चार, नांदेडमध्ये दोन तर हिंगोली व उस्मानाबादमधून प्रत्येकी एका उमेदरांची नावे जाहिर केली आहेत. 

मतदारसंघ निहाय उमेदवार : १) फुलंब्री – हरिभाऊ बागडे, २) औरंगाबाद पूर्व – अतुल सावे, ३) गंगापूर – प्रशांत बंब, ४)भोकरदन – संतोष दानवे, ५) बदनापूर – नारायण कुचे, ६) परतूर – बबनराव लोणीकर, ७) परळी – पंकजा मुंडे – पालवे, ८) आष्टी – भिमराव धोंडे, ९) माजलगाव – रमेश आडसकर, १०) गेवराई – अॅड. लक्ष्मण पवार, ११) तुळजापूर – राणाजगजितसिंह पाटील, १२) निलंगा – संभाजी पाटील निलंगेकर, १३) औसा – अभिमन्यू पवार, १४) अहमदपूर – विनायकराव जाधव पाटील, १५) हिंगोली – तानाजी मुटकुळे, १६) मुखेड – तुषार राठोड आणि १७) भोकर – भाऊसाहेब गोरठेकर. 

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: