राज ठाकरे म्हणाले, मोदी निर्लज पंतप्रधान

टीम ग्लोबल न्यूज:
सोलापूर : मी चार वर्षापुर्वी सांगितले होते निवडणुकीच्या पूर्वी हे युध्दजन्य परिस्थिती निर्माण करतील तेच झाले. मते मिळविण्यासाठी पुलवामा घडविले. आता थेट शहीद जवानांच्या नावे मागणारे नरेंद्र मोदी हे निर्लज पंतप्रधान आहेत अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर कडक शब्दात टीका केली.
सोलापुरातील कर्णिकनगर भागात राज ठाकरे यांची सोमवारी सायंकाळी जाहीर सभा आयोजित केली होती.सभेची वेळ पाच ची होती. पावणेआठवाजता राज यांचे सभास्थळी आगमन झाले आणि नऊ वाजता त्यांनी भाषण संपविले. मोदी, अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चिरफाड करणारे व्हिडीओ दाखवित त्यांनी उपस्थितांच्या टाळ्या अन् शिट्टया मिळविल्या. पंतप्रधानांनी देशातील पहिले डिजिटल गाव म्हणून भाजपने जाहीरात केलेल्या हरिसाल ची वस्तुस्थिती व्हिडीओ दाखविले. जाहीरात केलेल्या त्या हरिसाल गावातील त्या तरुणाला ठाकरे यांनी सर्वांसमोर आणले. मोदी-शहाचे देखील त्यांनी व्हिडीओ दाखवित किती खोटारडे आहेत हे दाखवून दिले. लोकशाही संस्था मोडून काढणारे मोदी-शहा यांचे राजकीय क्षितीजावरील अस्तित्त्व संपवा असे आवाहन त्यांनी यावेळी केली. भाजपने देश लुटला त्यामुळे त्यांना लुटायची हीच वेळ आहे त्यांनी पैसे वाटले असे ते म्हणाले.

एवढंच नाही तर आता तुमच्याकडे कोणतेच मुद्दे शिल्लक राहिले नाहीत म्हणून तुम्ही नवमतदारांना आवाहन करत आहात, पुलवामा शहिदांच्या नावे मतं मागत आहात? जनतेला किती फसवणार? असे म्हणत राज ठाकरेंनी मोदींवर टीका केली आहे. सोलापुरात झालेल्या सभेत राज ठाकरे बोलत होते. काहीही झालं तरीही मोदी आणि अमित शाह यांना निवडून देऊ नका, असंही आवाहन त्यांनी केलं.
नरेंद्र मोदींवर देशातील लोकांनी भरभरून प्रेम केलं, त्यांना प्रचंड बहुमत दिलं पण मोदींनी देशाला, जनतेला फसवलं. आज ते शहीद जवानांच्या नावावर मतं मागत फिरत आहेत असाही आरोप त्यांनी केला.
नोटाबंदीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एखादा झटका यावा तसा घेतला आणि त्यामुळे साडेचार कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. पाच वर्षांपूर्वी आपण काय आश्वासनं दिली होती याचा त्यांना विसर पडला आहे असेही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

admin: