राज्यात येत्या सप्टेंबरपासून आचारसंहिता,तर ऑक्टोबर मध्ये निवडणूक

नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी बुधवारपासून तीन राज्यांच्या नेत्यांची बैठक राहुल गांधी घेणार आहेत. महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक 26 जून रोजी बैठक बोलविली आहे.

नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोकसीला लवकरच भारतात आणण्यात येणार; चोक्सीचं नागरिकत्व रद्द करण्यात येणार असल्याची माहिती अँटिग्वाच्या पंतप्रधानांनी दिली.

मुंबई : मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच दोन आमदारांना रेल्वेतील चोरट्यांनी लुटल्याची घटना आली समोर; आमदारांनाच लुटल्याच्या या घटनेमुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण.

देहू : देहूतील इनामदार वाड्यात संत तुकाराम महाराजांची शासकीय पुजा चंद्रकांत दादा पाटील आणि पार्थ पवार यांच्या हस्ते पार पडला. राज्यात चांगला पाऊस पडावा, अशी प्रार्थना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तुकोबा चरणी केली.

पुणे : राज्यात येत्या सप्टेंबरपासून आचारसंहिता लागेल आणि ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होतील, राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्तवलं भाकीत.

पुणे : संभाजी भिडे गुरुजी आणि शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना यावेळी देखील पोलिसांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या समोर चालण्यास परवानगी नाकारली.

वर्ल्डकपः इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टॉस जिंकला. प्रथम गोलंदाजीचा घेतला निर्णय. ऑस्ट्रेलिया ९ षटकात बिन बाद ३६ धावा.

ग्लोबल न्युज नेटवर्क: