राज्यात मोदींच्या 9 तर अमित शहांच्या 18 सभा होणार

मुंबई । विधानसभा निवडणुकीला आता अवघे काही दिवस राहिले आहेत. सर्वच पक्षांकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु आहे. सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्यानंतर आता प्रचार सभांना सुरुवात झाली आहे. स्टार प्रचारकांच्या यादी जाहीर झाल्या असून खऱ्या अर्थाने प्रचार सुरु झाला आहे. दरम्यान, भाजपच्या प्रचारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील सहभागी होणार आहेत.


मोदींच्या राज्यात 9 तर अमित शहा यांच्या 18 सभा होणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली आहे. पाटील म्हणाले, महाराष्ट्रासह हरियाणातही विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या राज्यात केवळ ९ सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी आता प्रचाराचे नियोजन सुरु आहे. सोमवारी अर्ज माघारीचा अंतिम दिवस झाल्यानंतर लढतींचे चित्र स्पष्ट होईल. मंगळवारी विजयादशमी अर्थात, दसऱ्याचा उत्सव असून त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराचा धूमधडाका सुरु होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना महायुतीच्या प्रचारार्थ अनेक स्टार प्रचारक मैदानात उतरणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय नेते, राज्यातील नेत्यांचा त्यात समावेश आहे.

मोदी रविवारी जळगाव जिल्ह्यात येणार असून जळगाव शहरात त्यांची जाहीर सभा होईल. सभेचे ठिकाण अद्याप निश्‍चित नसले तरी दोन-तीन दिवसांत ते निश्‍चित करुन सभेचे नियोजन करण्यात येणार आहे, असे श्री. महाजन यांनी सांगितले. ही जाहीर सभा ऐतिहासिक ठरविणार असल्याचा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: