पुणे : ओडिशाच्या किनाऱ्यालगत तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. २५) राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मान्सून पुन्हा सक्रिय : पुण्यासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पुढील 4 दिवस म्हणजेच 25 ते 28 ऑगस्ट दरम्यान माणूसन पुन्हा सक्रीय होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
सतर्कतेचा इशाराब : कोकण आणि गोवा किनारपट्टीवर जोरादार वारा असल्यानं मच्छिमारांसह पर्यटकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहे.