बार्शी: बार्शी शहरात आजवरच्या इतिहासात कधी नव्हे इतकी मोठी विकासकामे झाली आहेत. त्यामुळे बार्शीतील मतदार शहराचा आणखीन विकासासाठी राजाभाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असा विश्वास या भागातील माता-भगिनी यांनी दिला.
बार्शी मतदार संघातील अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक १५ मध्ये,
कविता राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी भव्य पदयात्रा काढून राजाभाऊ ना विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी मोठ्या प्रमाणावर महिला उपस्थित होत्या. यावेळी कविता राऊत यांनी महिलांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.यावेळी बाप्पा गव्हाणे, जयपाल राऊत, महेश देशमुख,मदन गव्हाणे, राजाभाऊ पोकळे आदी उपस्थित होते.
मदन गव्हाणे यांनी यावेळी या भागात पालिकेच्या वतीने केलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली. तसेच राजाभाऊ याचे या भागावर विशेष लक्ष असल्याचे त्यानी सांगितले.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi