राजाभाऊ राऊत यांच्या विजयासाठी हजारो महिला रस्त्यावर
बार्शी: बार्शी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या प्रचारार्थ आज बार्शी शहरात हजारो महिला रस्त्यावर उतरल्या.या महिलांनी शहरातील प्रमुख मार्गावर फिरून राजाभाऊ राऊत यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
या महिला पदयात्रेचे नेतृत्व कविताताई राऊत,निलोफर तांबोळी, तेजस्विनीताई कथले यांनी केले.बार्शी शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरून जवळपास आठ ते दहा हजार महिला माता-भगिनीं पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या. या पदयात्रेत नगरसेविका योजनाताई पवार, कुसुमताई सुर्वे, आशाताई लोंढे, राजश्रीताई शिंदे, रजियाताई बागवान, शबानाताई तांबोळी,शोभाताई मोरे, सोनलताई होनमाने,मनिषाताई पोफळे, पुष्पाताई वाघमारे,द्रुपदाताई चव्हाण,भगिरथीताई त्रिंबके यांच्यासह हजारो महिला सहभागी होत्या.
या पदयात्रेचे पांडे चौक येथे सभेत रूपांतर झाले.यावेळी अॅड. राजश्रीताई डमरे तलवाड, जयमाला गरड, सुनंदा काळे, अंकिता शिंदे,अंजली राऊत यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi