राजकारणातील भिष्माचार्य: तरुणांना लाजवेल असे उत्साही व्यक्तिमत्त्व ८२ वर्षीय शिवाजीराव पंडित

राजकारणातील भिष्माचार्य: तरुणांना लाजवेल असे  उत्साही  व्यक्तिमत्त्व ८२ वर्षीय शिवाजीराव पंडित

  शिवाजीराव पंडित—-उत्साही दादा प्रसन्न दादा

राजकारणातील भिष्माचार्य  मा. श्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या  वाढदिवसानिमित्त लिहिताना मला मनस्वी आनंद होत आहे. विजयादशमी निमित्त दादांचे काल सकाळी दर्शन घेतले. दादांनी मला हसत हसत आशिर्वाद देताना आज काय कवितेत यमक जुळवलय असे विचारुन मलाच हसायला लावले. यावेळी मनात सुचलेल्या ओळी…

उत्साही दादा प्रसन्न दादा
कोहिनूर हिरा दादा !
मायेचा आणि प्रेमाचा
खळखळणारा झरा दादा !!

असे हे दिलखुलास दादा वयाचे ८२ वर्ष झाले तरी तरुणांना लाजवेल असा उत्साह त्यांच्यात ठासून भरलेला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजयसिंह सुपुत्रासाठी आज दादांनी मतदारसंघात झंझावात  घातलाय. आपल्या जुण्या जाणत्या सहकारी मित्रांच्या गाठीभेटी घेत ते अस्थेवाईकपणे चौकशी करत आहेत.

पोराला आशिर्वाद द्या असे सांगताना दादा जुण्या आठवणींना उजाळा देत आहेत. आजूनही लोकवलय दादाभोवती असल्याचे गावोगावच्या प्रतिसादावरुन दिसून येत आहे. अजून शक्ती आहे तोपर्यंत तुमच्यासाठी येत राहीन हा विश्वास ते देत आहेत. दादांचा सन्मान, त्यांचा आदर, त्यांना मिळालेले लोकवलय सर्वांना प्रेरणादायी आहे.

सध्या ईलेक्शनची घाई आहे. धावपळ आहे. तरीही दादा  नित्यनेमाने आपल्या शेतात जाऊन एक फेरफटका मारतात, गड्यांशी चर्चा करतात, काय आहे नाही पाहतात, पैसा आडक्याची तजविज करतात जनावरांची काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन करतात, शेतीबाबत मौलिक असे विचार मांडतात. दादांना शेतीची प्रचंड आवड आहे. लोकांना शेती बद्दल मार्गदर्शन करतात.


सेंद्रिय शेतीचा ते आग्रह धरतात दादांनीही आपल्या शेतीत अनेक प्रयोग केले आहेत. फळे फुले, अन्नधान्य, भाजीपाला याचे उत्पादन घेतले आहे. दुध दुभत्याच्या बाबतीत दादा सतर्क आहेत. त्यासाठी त्यानी गाई म्हशी पाळून त्यांचा साभांळ करत आहेत.  शेतीबरोबरच जोडधंदा कसा करावा याचाही सल्ला दादा ईतरांना आवर्जून देतात.

दादांचे आणकी एक वैशिष्ट्य हे सांगता येईल की, त्यांचे भाषण अफलातून असते. त्यांचे भाषण ऐकणे म्हणजे एक पर्वणीच असते. त्याच्या भाषणात हशा आणि टाळ्या भरभरुन भरलेल्या असतात. आपल्या भाषणात दादा पोट तीडकीने बोलतात. शेतकऱ्यांच्या मुलाबद्दल त्यांना प्रचंड कळवळा आहे. शेतक-यांच्या मुलांने शिकले पाहिजे. ज्ञानी झाले पाहिजे.


प्रशासकीय सेवेतील नौक-यासांठी स्पर्धेत उतरले पाहिजे. हे सांगतानाच दादा म्हणतात नौकरी नाही लागली तर काम धंदा सुरु करावा, व्यवसायात उतरावे, आपली शेती सुधारीत करावी. आधुनिक शेती करुन उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करावा. खरे तर दादांचे भाषण विनोद आणि गंभीर मुद्याने ओतप्रोत भरलेले असते. सध्या दादांचे संवाद दौरे सुरु आहेत. त्यांच्या संवादात आज ही तीच उर्जा आहे, तोच सामान्यांचा कळवळा आहे, प्रेम आहे, माया आहे. सर्व आहे आणि विकासाचे विजयपर्व आहे.


दादांनी राजकरण केले ते सर्वसामान्य गोर गरीब, तळागाळातील, रंजलेल्या गांजलेल्या माणसांची सेवा करण्यासाठी. राज्यमंत्री पदापर्यत मजल मारली. पदावर असताना त्यांनी गरिबांसाठी काम केले. गोरगरिबांच्या मुलांना नौक-या देऊन त्यांचे संसार उभे केले. त्यांच्या घरात विकासाचा प्रकाश पसरवला.


तळागाळापर्यंत त्यांनी विकासाची गंगा नेली. शैक्षणीक संस्था स्थापण करुन गोरगरिबांच्या आणि ग्रामिण भागातील मुलामुलींना आपल्या भागात, आपल्या गावात शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या.

त्यांनी लावलेल्या शैक्षणिक संस्थेच्या रोपट्याचे आज वटवृक्षात रुपांतर झाले त्यांच्या संस्थेच्या आज  शाळा, महाविद्यालय, औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय, अध्यापक विद्यालय आणि महाविद्यालय आज दिमाखात शैक्षणिक काम करत आहे. गेवराई तालुक्यासह बीड जिल्ह्याच्या ग्रामिण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी केंद्र सरकाराचे नवोदय विद्यालय खास उस्मानाबादवरुन आणले. दादांनी या नवोदयसाठी गढीला जागा दिली म्हणुन आज गढीचे नवोदय विद्यालय आज दिमाखात ऊभे आहे. गोरगरिबांची मुले याच विद्यालयातून डॉक्टर आणि इंजिनिअर झाले आहेत. दादांची हीच खरी कमाई आहे.


दादांनी सहकार क्षेत्रातही भरीव काम केले.जयभवानी कारखाना उभा करुन तालुक्यात आर्थिक क्रांती घडवून आणली. शेतक-यांच्या उसाला हक्काचा कारखाना मिळाला. तालुक्यातील बेरोजगारांना रोजगार मिळाला.


जयभवानी कारखान्यामुळे तालुक्याचा कायापालट झाला. दादांना खरी साथ मिळाली त्यांची पत्नी सौ.शारदा देवी पंडित यांची. दादांच्या पाठीशी त्या खंभीर पणे उभ्या राहिल्या. त्यांनी घर सांभाळले. आपल्या मुलांना संस्कार दिले.

त्यामुळेच आज अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित, जयसिंग पंडित राजकीय सामाजिक, शैक्षणिक,
सहकार, शेती अशा विविध क्षेत्रात भरीव काम करत आहेत. दादा आणि भाभीसाहेब यांनी दिलेल्या सामाजिक कामाच्या बाळकडूनेच अमरसिंह पंडित शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातुन सामाजिक कामाचा वसा घेऊन काम करत आहेत. यातुनच सामुहीक विवाह सोहळा, आदर्श शिक्षक पुरस्कार, शारदा महोत्सव आदी कार्यक्रम घेऊन सामाजिक जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे.


त्यांच्या कल्पकतेने जलसंधारण कामे होऊन गेवराई तालुका पाणीदार झाला. याला दादाची प्रेरणा आहे. दादांनी एक संस्कारित पिढी निर्माण केल्यामुळे आज अमरसिंह पंडित आणि विजयसिंह पंडित यांच्याकडे लोक अभ्यासु नेते म्हणुन पाहत आहेत. विजयसिंह पंडित तर आज निवडणूकीला उभे आहेत. त्यांचे विजयपर्व गाजत आहे वाजत आहे.


तरुणांच्या गळ्यातील ते ताईत बनले आहेत. दादासाहेब आणि भाभीसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुण्याईने ते लोकप्रिय झाले आहेत. दादांच्या पावलावर पाऊल ठेऊन राजकारणात आगेकुच करणारे विजयसिंह पंडित यांनी लोकवलय निर्माण केले आहे. गेवराई तालुक्याचा आमदार विजयसिंह व्हावेत ही जनसामान्यांची आणि तरुणांची भावना आहे.


जयसिंग पंडित राजकारणात नसले तरी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात ते नवीन कांही करता येईल का यावर लक्ष ठेऊन असतात. थोडक्यात सांगायचे काय तर शिवाजीराव पंडित आणि शारदादेवी पंडित यांच्या पोटी जन्माला आलेले हे तिनही भाऊ एकसंघ कोहिनूर हिरे आहेत. दादांचा वारसा सक्षमपणे पुढे घेऊन जाणा-या  या तिघाही भावांच्या वाटचालीस माझ्या शुभेच्छा.

दादांचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने हे लिहित गेलो. दादावर किती लिहावे.. लिहावे तेवढे कमीच आहे . .दादासाहेब तुमचे हे वैभव असेच वाढत राहो. दादांना उदंड आयुष्य लाभो. दादांचा हात म्हणजे परिस आहे. दादा तुमच्या  परिसस्पर्शाने आजुन आनेकांचे सोने होवो हिच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना.
दादांचे  वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक अभिष्टचिंतन…!

सत्यप्रेम लगड
मो.९४२०४२२२२४

ग्लोबल न्युज नेटवर्क: