राजकारणाची पातळी घसरल्यानं अजित पवार नाराज – शरद पवार

माझ्या पाठीमागे चौकशीचा ससेमिरा लावल्याने अजित पवारांनी राजीनामा दिला असावा – शरद पवार

त्यांच्याशी भेटल्यावरच खरं काय ते कळेल असं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे

पुणे । माझ्या पाठीमागे चौकशीचा ससेमिरा लावल्याने अजित पवार अस्वस्थ होते. याच अस्वस्थेतून त्यांनी हा निर्णय घेतला असावा. माझा त्यांच्या संपर्क किंवा भेट झालेली नाही. त्यांच्याशी भेटल्यावरच खरं काय ते कळेल असं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. पुण्यातील मोदीबागेत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहीती दिली आहे.

राज्य सहकारी बॅंक घोटाळ्याशी कुठलाही संबंध नसताना माझे नाव या प्रकणात आल्याने ते उदिग्न होते. त्यांच्या चिरंजीवाने राजकारणात येवू नये, एखादा व्यवसाय करावा असा सल्ला अजित पवार यांनी त्यांच्या पुत्राला दिल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

दरम्यान, राज्य मध्यवर्ती सहकारी शिखर बॅँकेच्या कथित कर्ज घोटाळ्यात संशयित आरोपी म्हणून शरद पवारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत शरद पवारांनी ईडीच्या कार्यालयात जाण्याचा पवित्रा घेतला होता. परंतु मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी सिल्व्हर ओक या पवारांच्या बंगल्यावर जाऊन शरद पवारांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. यानंतर माध्यमांसमोर येत शरद पवारांनी ईडीच्या कार्यालयात जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

 शरद पवार स्वत: ईडीच्या कार्यालयात हजर राहणार असल्याच्या पार्श्वभूमीवर बॅलार्ड इस्टेट येथील ईडी कार्यालयाजवळ सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी 144 कलमान्वये जमावबंदी लागू केली होती. सकाळपासूनच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जमून ईडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. ‘अब की बार शरद पवार’ अशा घोषणा कार्यकर्त्यांकडून केल्या जात होत्या.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: