योग आणि प्राणायाम करून आपण कोरोना विरोधात लढू शकतो – पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोरोनाच्या साथीमुळे रविवारी सार्वजनिक गर्दी टाळून डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा होत आहे. कोरोना व्हायरसमुळे यंदा पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय योग दिवस हा डिजिटल पद्धतीनं साजरा केला जात आहे. देशभरात कोरोनाचा संसर्ग आणि संक्रमण टाळण्यासाठी पहिल्यांदाच डिजिटल स्वरुपात साजरा केला जात आहे.
आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जगतेला संबोधित केलं आहे. यावेळी त्यांनी कोरोनाला हरवण्यासाठी योग आणि प्राणायाम कसा महत्त्वाचा आहे हे सांगितलं. योग केवळ शारीरिकच नाही तर मानसिक स्वास्थही चांगलं ठेवण्यासाठी मदत करतो.
आपल्या सृदृढ आयुष्यासाठी योगा अत्यंत महत्वाचा असल्याचे सांगता कोरोनावर मात करण्यासाठी योगासने करण्याचेही मोदींनी सूचवले. प्रत्येकानं दिवसातला काही वेळ योग आणि प्राणायाम करायला हवा. योग आणि प्राणायाम करून आपण कोरोनाविरुद्ध लढा देऊ शकतो असंही मोदी म्हणाले आहे.
मोदी यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
– कोरोना आपल्या श्वसन यंत्रणेवर हल्ला करतो, पण प्राणायम केल्याने ही यंत्रणा मजबूत होते.
-प्राणायम आणि योग आपल्या श्वसनाचे विकार होऊ नये आणि इम्युनिटी वाढावी यासाठी मदत करतात
– संयम, सहनशक्ती आणि शांती मिळते
– योग अॅट होम योग विथ फॅमेली ही यावेळेची थीम आहे. कोरोनाचं संक्रमण टाळण्यासाठी घऱी राहून योग करा आणि तो आपल्या जीवनाचा हिस्सा बनायला हवा.