युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे रविवारी सोलापूर व उस्मानाबाद जिल्हा दौर्यावर

पंढरपूर- राज्यात दुष्काळाची दाहकता तीव्र असून जनता पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करू लागली आहेत तर जनावरांन चारा छावणी दाखल केल्याशिवाय पर्याय उरलेला नाही. या दुष्काळग्रस्त भागातील जनतेला दिलासा देण्यासाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे रविवारी सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या चारा छावण्यांना व दुष्काळाची तीव्रता मोठ्या प्रमाणात अनुभवत असलेल्या गावांना भेटी देणार असल्याची माहिती शिवसेनेचे सोलापूर जिल्हा समन्वय प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी दिली. याच्या नियोजनाची बैठक पंढरपूर विश्रामगृहात झाली. सावंत म्हणाले की , शेतकऱ्यांना आपली जनावरे छावणीत दाखल करण्यासाठी अनेक वेळेला खूप मोठे अंतर जावे लागते.त्यामुळे त्यांची उपासमार होण्याचे प्रसंग अनेक ठिकाणी निर्माण होत असल्याचे दिसून येते. शासनाकडून छावणीतील जनावरांना निर्धारित चारा उपलब्ध करून देण्यात येत असला तरी या पशुपालकांसाठी मात्र सोय नसल्यामुळे याबाबत शिवसेनेने आता पुढाकार घेतला आहे. चारा छावण्यातील शेतकरी बंधू भगिनीं साठी हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाप्रसाद योजना राबविली जाणार आहे . याचा शुभारंभ युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार डाँ. तानाजीराव सावंत असणार आहेत. सोलापूर
व उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागात भेट देण्यासाठी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे रविवारी सकाळी नऊ वाजता सोलापूर विमानतळावरआगमन होणार असून सोलापूर येथे चारा छावण्यांच्या महाप्रसाद वाटपासाठी अन्नधान्य टेम्पो वितरणाचे उद्घाटन सकाळी 9:30 वाजता यांच्या हस्ते होणार आहे. यानंतर ठाकरे हे उस्मानाबाद जिल्हयातील भूम येथे शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेणार आहेत .यावेळी तेथे महाप्रसाद वाटपाच्या टेम्पो वितरणाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजता सांगोला येथे त्यांचे हेलिकॉप्टरने आगमन होणार आहे. ते येथील चारा छावण्यांना भेट देऊन पशुपालकांशी सवांद साधणार आहेत.. या बैठकीला सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे माजी जिल्हाप्रमुख साईनाथ भाऊ अभंगराव, माजी आमदार शहाजीबापू पाटील, महिला आघाडी जिल्हा प्रमुख शैलाताई गोडसे ,ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाध्यक्ष जयवंतराव माने युवा सेना जिल्हाप्रमुख स्वप्निल वाघमारे ,सचिन बागल उपजिल्हाप्रमुख सुधीर अभंगराव महेश चिवटे ,वैभव मोरे, सूर्यकांत घाडगे, चरण चवरे, दत्‍तात्रय पवार ,तुकाराम भोजने ,भारत आवताडे ,तालुकाप्रमुख महावीर देशमुख ,मधुकर बनसोडे ,तुकाराम कुदळे ,मधुकर देशमुख ,नामदेव वाघमारे ,शहर प्रमुख रवींद्र मुळे ,कमरुद्दीन खतीब, प्रवीण कटारिया ,समाधान दास सुनील दत्तू ,विनोद कदम ,संजय घोडके ,नारायण गोवे व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

admin: