गणेश भोळे
बार्शी : सकल मराठा समाज बार्शी व राजाभाऊ राऊत मित्र मंडळ यांच्या संयुक्त विदयमाने गेल्या महिना भरापासून सुरू असलेल्या मराठा समाजातील विदयार्थ्यांसाठी मोफत एसईबीसी जात प्रमाणपत्र शिबीरात १३४५४ जणांनी जात प्रमाणपत्रासाठी नोंदणी करून या शिबीराचा लाभ घेतला. या नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना पुढील महिन्यात दाखले देण्यात आले.
येथील संत तुकाराम सभागृहात ९ ऑगस्ट रोजी या शिबीराचा सांगता कार्यक्रम झाला. यावेळी माजी आमदार राजेंद्र राऊत, तहसीलदार ऋषीकेत शेळके, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, रमेश पाटील, पांडुरंग गव्हाणे, नारायण जगदाळे, जयकुमार शितोळे, दिलीप मोहिते, प्राचार्य प्रकाश थोरात, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, कौरव माने, रावसाहेब मनगिरे, कुंडलिक गायकवाड, अनिल पवार, भारत पवार, दिलीप सुरवसे, उमेश डोईफोडे, प्रा.कल्याण घळके आदी उपस्थित होते.
माजी आ.राजेंद्र राऊत म्हणाले, या शिबीराचा अनेक विदयार्थ्यांना लाभ झाला. शासनाने मराठा समाजाला दिलेले विविध लाभ त्याआधारे विदयार्थ्यांना मिळतील. त्यांनी चांगले यश संपादन करावे अशी अपेक्षा व्यक्त करत समाजासाठी असलेल्या उत्तरदायित्वातूनच हा उपक्रम राबविण्यात आल्याची भावना व्यक्त केली.
तहसीलदार ऋषीकेत शेळके म्हणाले, जात प्रमाणपत्रासाठी विदयार्थ्यांना अनेक प्रक्रियेतून जावे लागते. या शिबीरामुळे त्यांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध झाल्या. आपण स्वत: व प्रशासनाने शिबीरार्थींना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केल्याचे सांगितले.
प्रास्ताविकात मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रा. किरण गाढवे म्हणाले, ६ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत हे शिबीर राबविले गेले. एका ठिकाणी समाजबांधवांसाठी प्रमाणपत्र सुविधा उपलब्ध केल्यामुळे प्रवेशासाठी फायदा झाला. समाजोपयोगी उपक्रमाची सुरूवात तालुकास्तरावर विक्रमी नोंदणी करून झाली. माजी आ.राजेंद्र राऊत यांचे यासाठी मोलाचे सहकार्य लाभले.
जय शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय राऊत म्हणाले, विदयार्थ्यांना मोफत जात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. त्यासाठी माजी आ. राजेंद्र राऊत यांनी आर्थिक भार उचलत सहकार्य केल्याचे सांगितले.
यावेळी माजी आ.राजेंद्र राऊत यांचा सकल मराठा समाज तसेच शिबीरातील लाभार्थी विदयार्थीनींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिबीरात चांगली सेवा दिल्याबद्दल केदारनाथ, बालाजी, ओंकार, सदगुरू व सावनी या ५ महा ई सेवा केंद्र चालकांचाही सत्कार करण्यात आला. मंडलअधिकारी उमेश डोईफोडे यांनी प्रमाणपत्रासाठी प्रशासकीय पातळीवर गतीने प्रक्रिया राबविल्याबद्दल त्यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
प्रमाणपत्राच्या लाभार्थ्यांच्यावतीने अंजली मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.
शिबीरासाठी नगरसेवक मदन गव्हाणे, महेश देशमुख, विजय राऊत, रावसाहेब यादव, अजय पाटील, उमेश काळे, मंगेश दहिहांडे,संदीप मिरगणे, प्रगती सुरवसे, रोहित पाटील, सुमित जगदाळे, दिनेश बुरगुटे, सम्राट बदाले, चंदन लांडगे, उमेश कांबळे, आकाश तावडे, चैतन्य जगदाळे, सुरज राऊत, अक्षय सारंग, केदार पवार, बारंगुळे, सतीश राऊत, शंतनू पवार यांनी परिश्रम घेतले.
प्राप्त प्रमाणपत्राचे वाटप, उर्वरीत प्रमाणपत्रे संबंधित महाईसेवा केंद्रातून मिळणार
सुरूवातीला ज्यांनी शिबीरात नोंदणी केली त्यापैकी प्राप्त जात प्रमाणपत्रांचे यावेळी वाटप करण्यात आले. शिबीरात नोंदणी केलेल्यांना टोकन देण्यात आले आहे. साधारणत : ४०-४५ दिवसांत ही प्रमाणपत्रे मिळतात. शिबीरातील टोकनधारकांना संबंधित महा-ई-सेवा केंद्रातून ती मोफत मिळणार आहेत. संबंधितांनी तेथून ती घ्यावीत असे आवाहन यावेळी आयोजकांच्यावतीने करण्यात आले.