म्हणून शरद पवारांनी या उस्मानाबाद च्या कार्यकर्त्याला भेटायला बोलावलं !

ग्लोबल न्यूज नेटवर्क: सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अनेक नेते सत्ताधारी भाजप-शिवसेनेत जात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेत्यांची पोकळी निर्माण झाली आहे.असे असले तरी राज्यातील गावागावात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री राणाजगजितसिंह पाटील यांनी ही भाजपात प्रवेश केल्यानंतर उस्मानाबाद-कळंब मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस प्रेमी कार्यकर्त्यांनी छोटेखानी मेळावा घेतला या मेळाव्यात एका कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधून नेते आणि पदाधिकारी गेले असले तरी पक्षातील 40 टक्के पेक्षा जास्त कार्यकर्ते शरद पवार आणि फुले-शाहू आंबेडकर यांच्या विचाराचे आहेत व ते पक्षासोबत असून पवार साहेबानी आजवर हजारो कार्यकर्त्यांना नेते बनवले आहे अशा पध्दतीने भाषण करत आजचा हा मेळावा म्हणजे आपला राजकीय स्वतंत्रता दिवस असल्याचे म्हटले आहे. हे भाषण ऐकून शरद पवार यांनी त्याला बोलवून घेऊन त्याच्या पाटीवर शाबासकी ची थाप मारली आहे. त्यामुळे हा कार्यकर्ता प्रकाशझोतात आला आहे.

आपल्या सर्वांना जय राष्ट्रवादी नमस्कार सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्त्यांना राजकीय स्वतंत्रता दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आज 80 टक्के पदाधिकारी,60 टक्के सक्रीय कार्यकर्ते पक्ष सोडून गेले असले तरी उर्वरित सर्व कार्यकर्ते हे पवार साहेबांच्या विचारा सोबत आहेत. सुरुवातीला मला वाटले होते की मी एकटाच आहे की काय पण आपण सर्वजण मिळून संख्या मोठी आहे.

आजवर ही आपण होतो, पक्ष कार्य करत होतो मात्र ज्याप्रमाणे गढूळ पाण्यात सोन्याची अंगठी दिसत नाही त्याप्रमाणे आपण दिसत नव्हतो.
आपली ताकत मोठी आहे. जनता पवार साहेबांच्या विचारा सोबत आहे. अनेक नेते हे संकटाला घाबरून पक्ष सोडून पळून गेले आहेत. आपण मात्र संकटाला घाबरणारे नाही आहोत. आपण पक्षासोबत खंबीरपणे उभे राहिले आहोत असे मुद्देसूद भाषण कळंब च्या कार्यकर्त्यांने या बैठकीत केले. त्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे भाषण ऐकून स्वतः शरद पवार यांनी त्याला बोलवून घेऊन त्याच्याशी चर्चा करून त्यांना प्रोत्साहन दिले आहे.

यापूर्वी ही शरद पवार यांनी अश्याच पध्दतीने अनेक कार्यकर्ते व त्यातून नेते तयार केले आहेत.

वाघमारे यांच्या भाषणाचा व्हिडिओ ⬅️ क्लिक करा

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

admin: