म्हणून मुख्यमंत्र्यांकडून गडकरींचे कौतुक, नितीनजी आपले लाख लाख धन्यवाद

सुरज गायकवाड

मुंबई : मी राजकारण बाजूला ठेऊन या लढाईत लढतो आहे. मात्र, काही जणांकडून राजकारण केलं जात आहे. मी या फंद्यात पडत नाही, सध्या करोनाच्या लढाईत लढायचं हे माझं प्राधान्यानं काम आहे. पण, मला अनेकांकडून तसं सांगण्यात येतंय. जर, तसं घडत असेल तर मला आवर्जून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचं आभार मानायचंय . नितीनजी आपले लाख लाख धन्यवाद… असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नितीन गडकरींना धन्यवाद दिले.

ग्रामीण भागात आपण काही प्रमाणात उद्योगधंद्यांना मुभा दिलीय. त्याचा रिपोर्ट रोज माझ्याकडं येतोय. आज संध्याकाळीही मी आढावा घेणार आहे. राज्य सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माहिती दिली. “लॉकडाउनमुळे करोनाचा गुणाकार कमी करण्यात यशस्वी झालो आहोत. करोनाची वाढ आपण काही प्रमाणात नियंत्रणात ठेवली आहे. मात्र, या लढाईत दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलिसांनी मी आंदराजली वाहतो, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी करोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांना श्रद्धांजली वाहिली.

नितीन गडकरींचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मनापासून आभार मानले आहेत. राजकारण बाजूला ठेवून आपण सगळे लोकं एकत्र आलोत. राजकारण टाळण्याचा सल्ला नितीन गडकरींना दिला आहे. अजूनही काही जण राजकारण करत आहेत. पण ठिक आहे त्यांना राजकारण करू द्या. मुंबईत आलेल्या केंद्रीय पथकाने तटस्थपणे पाहणी करावी. काही म्हणत आहेत, बघा काय डाळ शिजत आहे. मात्र, केंद्राकडून रेशनची डाळ आल्यानंतर कोणती डाळ शिजत आहे ते पाहू अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजकारण करणाऱ्यांना सुनावले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: