… म्हणून भाजप नेत्यांची भेट घेतली होती, विखे-पाटलांच्या आरोपांवर थोरातांची खोचक प्रतिक्रिया

दोन ते तीन वर्षापूर्वी बाळासाहेब थोरात भाजपच्या संपर्कात होते, असा आरोप राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. विखे-पाटील यांच्या या आरोपांवर पहिल्यांदा बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विखे-पाटलांच्या या वक्तव्याला जास्त महत्त्व द्यावे असे मला वाटत नाही, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. तसेच भाजपच्या नेत्यांना मी हे सांगायलो भेटलो होतो की, आमचे चांगले लोक तुमच्याकडे पाठवत आहे, आणि घडलेही तसेच, असा खोचक टोलाही थोरात यांनी विखे-पाटलांना लगावला.

राधाकृष्ण विखे-पाटलांनी केलेल्या वक्तव्याला जास्त महत्त्व देण्याची आवश्यकता नाही. अख्खा महाराष्ट्र दोघांना ओळखतो. एका पक्षात राहून दुसऱ्या पक्षाकडे पाहण्याची माझी सवय नाही, असा टोलाही थोरात यांनी विखे-पाटलांना लगावला. तसेच आतापर्यंत काँग्रेसच्या विचारने काम करत आलो आणि यापुढेही करत राहिल. माझ्यावर राज्याची आणि पक्षाची जबाबदारी आहे त्यामुळे अशा छोट्या गोष्टींकडे मला लक्ष द्यायला लावू नका असा खोचक टोला थोरातांनी विखे-पाटलांना लगावला.

ते पुढे म्हणाले, माझ्या मनामध्ये काँग्रेस पक्ष सोडण्याचा विचारही नाही. आता सत्ता बदलली आहे, कोण-कोण बदलेल हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या (विखे-पाटील) नावाची चर्चा सुरु झाली असावी असेही ते म्हणाले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: