मुलाने पायी तुळजापूर वारी करून फेडला वडील आमदार झाल्याचा नवस;वाचा सविस्तर-

मुलाने पायी तुळजापूर वारी करून फेडला वडील आमदार झाल्याचा नवस;वाचा सविस्तर-

बार्शी – बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रणवीर राऊत यांनी चालत तुळजापूरची वारी पूर्ण केली. तुळजापूर येथे आज सकाळी तुळजाभवानी मंदिरात तुळजाभवानीचे मातेचे दर्शन घेतले. यावेळी, नगरसेवक दीपक राऊत, बापू पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्तेही पायी दर्शनाला गेले होते. शनिवारी रात्री बार्शीतून सुरू झालेली ही पायी वारी, आई राजा उदो उदो… च्या जयघोषात रविवारी पहाटे पूर्ण झाली.

तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार राजेंद्र राऊत यांचे सुपुत्र रणवीर राऊत यांनी आई तुळजाभवानीला नवस केला होता. वडिल राजेंद्र राऊत आमदारपदी निवडून आल्यानंतर, बार्शी ते तुळजापूर असा पायी प्रवास करण्याचा आपला नवस त्यांनी पूर्ण केला. आपल्या मित्र आणि कार्यकर्त्यांसह रणवीर यांनी बार्शी ते तुळजापूर असा पायी प्रवास केला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राजेंद्र राऊत यांचा 3076 मतांनी विजय झाला.

त्यामुळे रणवीर राऊत यांनी तुळजाभवानी मातेला बोलून दाखवलेली इच्छापूर्ती झाली. म्हणून पायी प्रवास करत ते तुळजाभवानी मातेसमोर नतमस्तक झाले. दरम्यान, तत्पूर्वी शनिवारी रात्री शहरातील देवीची नगरसेवक विजय (नाना) राऊत यांच्या हस्ते आरती करुन या पायी वारीला सुरुवात करण्यात आली होती. त्यावेळी उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, उपसभापती अविनाश मांजरे, नगरसेवक काका फुरडे, भैय्या बारंगुळे, बापू जाधव, केदार पवार, रणजीत बारंगुळे आदि उपस्थित होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: