मुख्यमंत्र्यांना पांडुरंग पावला !यावर्षीची विठ्ठलाची महापूजा पंढरपूरात गेल्यावर्षी केली ‘वर्षा’वर

ग्लोबल न्यूज नेटवर्क | मराठा आरक्षणाचा निर्णय उच्च नायायलाने वैध ठरवला. मराठा समाजाने संपूर्ण महाराष्ट्रात एकच जल्लोष केला. उच्च न्यायालयाने आरक्षण वैध ठरवल्यामुळे, मुख्यमंत्र्यांना विठ्ठल पावला असचं म्हणावं लागेल.

कारण गेल्यावर्षी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून काही मराठा संघटनांनी मुख्यमंत्र्यांना आषाढीची महापूजा करू देणार नाही, असा इशारा दिला होता. काही समाजकंटक पंढरपूरात आषाढी दिवशी साप सोडून चेगराचेगरी घडवणयाच्या प्रयत्नात होते. अशी सरकारला गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरला न जाता, घरीच विठ्ठलाची पूजा केली होती. पण आता मात्र मुख्यमंत्र्यांना विठ्ठल पावलाय असं म्हणावं लागेल.

गेल्या आषाढी एकादाशीला मुख्यमंत्री पंढरपूरात पाडुरंगाच्या पुजेसाठी जाऊ शकले नव्हते. कारण लाखो वारक्ऱ्यांमध्ये साप सोडण्याची भिती पसरवली गेली होती. आणि मुख्यमंत्री आले तरच साप सोडले जाणार होते. या आषाढीला मुख्यमंत्र्याच्या हस्ते सपत्नीक पांडिरंगाची पूजा होईल. तर गेल्या वर्षी आषाढीच्या महापूजेचा मान हिंगोलीच्या जाधव दांपत्याला मिळाला होता.

आज मराठा आरक्षण उच्च न्यायालात वैध ठरलं. आणि सरकारनं सुटकेचा निश्वास सोडला. तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आनंदोत्सव साजरा झाला. आता यावर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आषाढीची महापूजा पत्नी अमृता यांच्यसह करतील. कारण गेल्यावर्षी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून काही मराठा संघटनांनी मुख्यमंत्र्यांच्या आषाढी पुजेला विरोध केला होता, मराठा आरक्षण लागू होतं नाही तोपर्यंत 76 हजार पदांची मेगाभरती रद्द करावी, अशी मागणीही काही संघटनांनी केली होती.

तेव्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा उच्च न्यायालायात होता. त्यामुळे सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून कोणताही निर्णय घेऊ शकणार नव्हतं. त्यातच पोलीसांना गुप्त माहिती मिळाली होती, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचा थरकाप उडाला होता. वारीत साप सोडून, पंढरपूरमध्ये चेगराचेगरी घडवण्याचा काही समाज कंटकांचा प्रयत्न होता.

पंढरपूरमध्ये दरवर्षी आषाढीसाठी दहा लाखांपेक्षा जास्त वारकरी येतात. पंढरपूर हे वारकऱ्यांच्या गर्दीत ओसंडून जातं. पंढरपूरमध्ये पाऊल ठेवायला जागा नसते. अशावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातलं वातावरण पेटलेलं असताना. पोलिसांनी दिलेली ही गुप्त बातमी खरोखरच महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला भीती वाटणारी अशीच होती.

खर तरं मुख्यमंत्र्यांना आषाढीची पूजा करण्यापासून कुणीही अडवू शकलं नसतं

या गुप्त बातमीवरून महाराष्ट्रात बराच गदारोळही झाला. 700 वर्षांच्या आषाढीच्या परंपरेत अशा पद्धतीनं काही वाईट घडना घडली नव्हती, किंवा वारीमध्ये असं काही घडवावं असा विचारही मुघल किंवा मुस्लिम शासकांनी केली नव्हता.

खर तरं मुख्यमंत्र्यांना आषाढीची पूजा करण्यापासून कुणीही अडवू शकलं नसतं, मुख्यमंत्री आषाढीच्या पुजेसाठी आले तर त्यांच्यावर दगडफेक केली जाईल, अशाही धमक्या देण्यात आल्या होत्या. पण हे पेटलेंलं वातावरण शांत करण्यासाठी, दहा लाख वारकऱ्यांमध्ये आणि जवळपास एक कोटी धारकऱ्याच्या कुटुंबांमध्ये पसरलेली अस्वस्थता, भिती संपवण्यासाठी शेवटी मुख्यमंत्र्यांनीच निर्णय घेतला.

ग्लोबल न्युज नेटवर्क: