मुख्यमंत्री तर अनेक आले मात्र महाराष्ट्र उभा राहु शकला नाही: जे पी नड्डा यांची टीका

नंदुरबार । महाराष्ट्राची जनता मजबुत होती. मात्र, महाराष्ट्रातील कॉग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतृत्व कमजोर आणि भ्रष्ट्राचारी असल्यानेच ताकदवर महाराष्ट्रात वसंतराव नाईक आणि देवेंद्र फडवणीस वगळता एकही मुख्यमंत्री पाच वर्षाचा मुख्यमंत्री राहु शकला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री तर अनेक आले मात्र महाराष्ट्र उभा राहु न शकल्याची घणाघाती टिका भाजपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी नड्डा यांनी केली आहे.

भाजपा आदिवासींचे आरक्षणांवर गदा आणत असल्याचा अपप्रचार हा कॉग्रेस राष्ट्रवादीकडुन सुरु आहे. मात्र, मोदी आणि फडवणीस यांच्या सरकारमध्ये आदिवासींचे आरक्षण कायम राहणार असुन त्यांच्या सर्वाधीक विकास करण्यासाठी नव्या योजना देखील सुरु केल्या जाणार असल्याची घोषणा जे. पी नड्डा यांनी केली आहे. आघाडीचे अर्धे भ्रष्ट्राचारी नेते जेलमध्ये तर अर्धे बेलवर असल्याने भाजपा हाच सक्षम पर्याय असल्याचे देखील जे.पी नड्डा यांनी सांगीतले आहे. आज शहादा मतदारसंघातील तळोदा शहरात भाजपा उमेदवार राजेश पाडवी यांच्या प्रचारार्थ त्यांची सभा संप्पन झाली

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi


ग्लोबल न्युज नेटवर्क: