मी तालुक्याच्या विकासासाठी अहोरात्र झटतोय ,विरोधक मात्र निवडणुका आल्या की सक्रिय होतात – राजेंद्र राऊत

बार्शी तालुक्यातील पशुधन वाचविण्यासाठी चारा छावण्या सुरु केल्या — राजेंद्र राऊत

बार्शी : मागील चार महिन्यांपूर्वीच्या उन्हाळ्यात महाराष्ट्रासह संपूर्ण बार्शी तालुका दुष्काळाने होरपळून, दुष्काळी परिस्थितीशी झगडत होता. या दुष्काळी परिस्थितीच्या झळा आपल्या सर्वांना बसत असताना, आपल्या संस्कृतीत सर्वांसाठी प्रिय व आपुलकीचे असलेली, शेतक-यांची संपत्ती असलेल्या मुक्या जनावरांचे पशुधन वाचविण्यासाठी बार्शी तालुक्यात वैराग, भोईंजे, कोरेगाव या ठिकाणी चारा छावण्या सुरू केल्या.

मीसुद्धा तुमच्यासारखाच शेतकरी कुटुंबातील असून, मी एक हाडाचा शेतकरी आहे.त्यामुळे मी या दुष्काळी परिस्थितीची दाहकता ओळखून शेतकरी बांधवासमोर उभा राहिलेला जनावरांसाठी चारा व पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला असल्याचे अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सांगितले.

घाणेगांव येथील प्रचार सभेत ते बोलत होते.यावेळी संतोष दादा निंबाळकर, अनिल काका डिसले, डॉ. कपिल कोरके, कुंडलिकराव गायकवाड, झुंबरदादा जाधव, प्रशांत जाधव,अॅड.सुरवसे आदींनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  राऊत म्हणाले, या दुष्काळात तालुक्यातील प्रत्येक गावासाठी पंचायत समितीच्या मार्फत, बार्शी नगर परिषदेच्या माध्यमातून  टॅंकरने पाणी पुरवठा केला. त्याचप्रमाणे उजनी धरण कोरडे पडलेले असताना बार्शी शहराला सुरळीत  पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला.

बार्शी शहरात 68 बोअर मारून,पाण्याच्या टाक्या बसवून त्यामार्फत पाणी पुरवठा केला. आपला बार्शी तालुका हा अवर्षण प्रवर्षण भागातील असून, दहा वर्षातील सहा वर्ष आपल्याला तालुक्यात दुष्काळी परिस्थितीशी झगडावे लागते. निसर्गाच्या या लहरीपणावर मात करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून या तालुक्यात काम केले पाहिजे. त्यासाठी आपण तालुक्यात जास्तीत जास्त वृक्षारोपण करणे, जलसंधारणाच्या माध्यमातून, तसेच गावातील ओढे-नाले खोलीकरण रुंदीकरण करून पाण्याचा स्त्रोत वाढण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

बार्शी तालुक्यात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस  यांच्या मार्गदर्शनाखाली काम करुन अनेक साठवण तलाव, बंधारे बांधण्याचा निश्चय करून त्या कामांना गती देऊन त्या कामांची सुरुवात केली. तालुक्यातील नद्यांचे पुनरुज्जीवन,ओढे-नाले खोलीकरण रुंदीकरण, जलसंधारणाची कामे,साठवण तलाव, बंधारे बांधणे इत्यादी कामासाठी त्यांच्यामार्फत निधी उपलब्ध केला. याचा फायदा भविष्यात निश्चितच आपल्याला होऊन गावागावात पाण्याचे स्त्रोत निश्चित निर्माण होतील. जेणेकरून भविष्यात दुष्काळाचा सामना करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही.

तालुक्यात सतत पडणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी मी सतत प्रयत्नशील असून आपण सर्वांनी मिळून, एकीचे बळ दाखवून पाण्याचा स्त्रोत कसे निर्माण होईल यासाठी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.


::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: