मुकेश अंबानींनी केली जिओ फायबरची घोषणा, ५ सप्टेंबरला लाँच


रिलायन्स जिओचा आता डीटीएच क्षेत्रात धमाका; केली मोठी घोषणा


रिलायन्स इंडस्ट्रीज लि. कंपनीच्या 42 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी अपेक्षेप्रमाणे मोठ्या घोषणा केल्या. ५ सप्टेंबरला जिओ गिगाफायबरचे व्यावसायिक लाँचिंग होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. जिओ गिगाफायबरच्या प्लॅनची सुरुवात ७०० रुपयांपासून ते १० हजार रुपयांपर्यंत असेल. जिओच्या फायबर वार्षिक स्वागत ऑफर अंतर्गत ४ डी/४ के टेलिव्हिज सेट आणि ४ के सेटटॉप बॉक्स मोफत मिळेल. त्याचबरोबर जिओचा मिक्स रिअॅल्टीही (एमआर) लाँच केला गेला आहे. त्याचे नाव जिओ होलोबोर्ड असेल. लवकरच त्याची बाजारात विक्री सुरु होईल. 

जाणून घ्या सर्व घोषणांचे अपडेट्स… 

जिओ फायबर ग्राहकांना मोफत एचडी टीव्ही

५ सप्टेंबरला सर्व टेरिफ आणि प्लानची माहिती जिओ ऍप आणि जिओच्या वेबसाइटवर उपलब्ध होईल. जे जिओ फायबर ग्राहक वार्षिक प्लॅन घेतील. त्यांना एचडी आणि ४ के टीव्ही त्याबरोबरच ४ के सेट टॉप बॉक्स मोफत दिला जाईल. त्याला जिओ फायबर वेलकम ऑफर नाव देण्यात आले आहे.

स्मार्ट होम सोल्यूशन मोफत

गिगाफायबरची जोडणी घेणाऱ्या सबस्क्रायबर्सना हायस्पीड ब्रॉडबँडशिवाय लँडलाईन कॉलिंग, जिओ आयपीटीव्हीसह स्मार्ट होम सोल्यूशनही मिळेल.

ज्या दिवशी चित्रपट रिलिज होईल, त्याचदिवशी पाहता येणार

जिओच्या ग्राहकांना ज्या दिवशी चित्रपट रिलिज होईल, त्याचदिवशी पाहू शकतील. २०२० पासून ही सेवा सुरु होईल. जिओ पोस्टपेड प्लस सेवाही सुरु होईल.

वर्षभरात जिओ फायबर

पुढच्या वर्षभरांत जिओ फायबरचे काम पूर्ण होईल- मुकेश अंबानी

स्थानिक केबल ऑपरेटर्सला संधी- मुकेश अंबानी

सध्या केबल ऑपरेटर यांचा व्यवसाय संकटात आला आहे. जिओ केबल नेटवर्कला प्रोत्साहन देईल. जिओकडे साधारणपणे २० हजार कोटी रुपयांचा महसूल मिळवण्याची संधी आहे. यामध्ये सर्व केबल ऑपरटेर्सला संधी देण्यात येईल.

जिओचे नेटवर्क ५ जी रेडी

मुकेश अंबानींच्या मते जिओचे नेटवर्क ५ जी रेडी आहे. तर वायरलेस नेटवर्क ४ जी युक्त आहे. त्याचे ५ जीमध्ये रुपांतर करता येईल. जिओसाठी इंटरनेट ऑफ थिंग्ज, होम ब्रॉडबँड सेवा, इंटरप्रायजेस सेवा, लघु उद्योगांसाठी ब्रॉडबँड याचवर्षी सुरु होतील.

जिओ अव्वल

जिओ ग्राहकांची संख्या ३४ कोटी झाली आहे. जिओच्या लाँचिंगला यावर्षी ५ सप्टेंबरला ३ वर्षे होतील. प्रत्येक महिन्याला १ कोटी ग्राहक जोडले जात आहेत. सध्या रिलायन्स जिओ भारतात पहिल्या क्रमांकावर आहे. जिओत ३.५ कोटींची गुंतवणूक करण्यात आलेली आहे.

सौदी अरमॅकोबरोबर करार

सौदी अरमॅको आणि रिलायन्समध्ये करार. त्यासाठी सौदी अरमॅको ऑईल आणि केमिकल विभागात २० टक्के गुंतवणूक करणार.

सर्वाधिक जीएसटी भरला



रिलायन्सने ६७,३२० कोटी जीएसटी भरला आहे. तर १२१९१ कोटी प्राप्तिकर भरला आहे.: मुकेश अंबानी

रिलायन्स देशातील सर्वांत मोठी रिटेल कंपनी- मुकेश अंबानी

जिओचे ३४.४ कोटी ग्राहक आहेत. रिलायन्स रिटेलची १३० हजार कोटींची उलाढाल आहे. ही देशातील सर्वांत मोठी रिटेल कंपनी आहे. २ व्यवसाय ३२ टक्के ईबीटीमध्ये योगदान देतात. त्यांची हिस्सेदारी ५० टक्के असू शकते.

सर्वाधिक नफा कमावणारी कंपनी

रिलायन्स समूह मागीलवर्षी सर्वाधिक नफा कमावणारी कंपनी बनली आहे. कंपनीचे ३ ग्रोथ इंजिन आहेत. १. ऑईल, २. जिओ आणि रिटेलने चांगली कामगिरी केली आहे असल्याचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी या बैठकीत सांगितले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: