मुंबईत आज आतापर्यंतची सर्वात मोठी कोरोना रुग्णवाढ झाली असून नवीन 1571 कोरोनाबाधितांची नोंद झाली. यामध्ये 590 प्रलंबित अहवाल असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. शिवाय 13 प्रलंबित रिपोर्टसह एकूण 38 जणांचा मृत्यू झाला. यामुळे एकूण रुग्णांची संख्या 19 हजार 967 झाली आहे.
मुंबईत कोरोना रुग्णवाढ कायम राहिली असून दररोज शेकडो रुग्ण वाढत आहेत. मृत्यू झालेल्या 38 जणांमध्ये 28 पुरुष आणि दहा महिलांचा समावेश आहे. शिवाय मृतांमधील 23 जणांना दीर्घकालीन आजारही होते. तर 20 जणांचे वय 60 वर्षांपेक्षा होते.
यामुळे मृतांची एकूण संख्या 734 झाली आहे. दरम्यान, गेल्या एकाच दिवसात 206 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या 5012 झाली आहे.धारावीतही आज नव्या 44 रुग्णांची नोंद झाल्याने याठिकाणची रुग्णसंख्या 1242 झाली आहे. तर माहीममध्ये 6 रुग्ण सापडल्याने याठिकाणची रुग्णसंख्या 193 तर दादरमध्ये 5 रुग्ण सापडल्याने याठिकाणची रुग्णसंख्या 159 झाली आहे.