मुंबईतील मुसळधार पावसामुळे सिद्धेश्वर एक्‍स्‍प्रेससह १० गाड्या रद्द

सोलापूर : मुंबईत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील रेल्वे रूळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे सोलापुरातून मुंबईला जाणार्‍या सिद्धेश्वर एक्सप्रेससह 10 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये मेल, एक्सप्रेस, पॅसेंजरचा समावेश आहे, तर काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत.

🚂रद्द करण्यात आलेल्या गाड्या

3 ऑगस्ट रोजी प्रस्थान स्थानकावर निघणारी गाडी क्रमांक 51027 मुंबई पंढरपूर फास्ट पॅसेंजर, गाडी क्रमांक 12115 मुंबई सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस, गाडी क्रमांक 11027 मुंबई-चेन्नई एक्सप्रेस, गाडी क्रमांक 51033 मुंबई-साईनगर फास्ट पॅसेंजर, गाडी क्रमांक 51034 साईनगर – मुंबई फास्ट पॅसेंजर, रद्द करण्यात आल्या आहेत.

तसेच 4 ऑगस्ट रोजी गाडी क्रमांक 170 32 हैदराबाद – मुंबई एक्सप्रेस, गाडी क्रमांक 12702 हैदराबाद – मुंबई हुसेन सागर एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 121 16 सोलापूर मुंबई-सिद्धेश्वर एक्सप्रेस, गाडी क्र. 12115 मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस, गाडी क्र. 51029 मुंबई-विजापूर फास्ट पॅसेंजर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

🚆आंशिक रद्द करण्यात आलेल्या गाड्या

1 ऑगस्ट रोजीची गाडी क्रमांक 18519 विशाखापट्‍टनम लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस ही पुण्यापर्यंत धावेल आणि ही गाडी क्र 18520 लोकमान्य टिळक टर्मिनस विशाखापट्‍टनम एक्‍स्‍प्रेस म्हणून 4 ऑगस्ट रोजी पुणे स्थानकावरून धावेल. ही गाडी पुणे लोकमान्य टिळक टर्मिनस पुणे दरम्यान धावणार नाही. 3 ऑगस्ट रोजी गाडी क्रमांक 51030 विजापूर मुंबई फास्ट पॅसेंजर ही पुण्यापर्यंत धावेल.

2 ऑगस्ट रोजी गाडी क्रमांक 11028 चेन्नई-मुंबई एक्सप्रेस ही पुण्यापर्यंत धावेल आणि आणि ही गाडी पुणे स्थानकावरून 11041 मुंबई-मद्रास एक्सप्रेस म्हणून 4 ऑगस्ट रोजी धावेल. ही गाडी पुणे मुंबई दरम्यान धावणार नाही.

2 ऑगस्ट रोजी गाडी क्रमांक 18519 विशाखापटनम लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस पुणे स्थानकापर्यंत धावेल. ही गाडी पुणे स्थानकावरून 4 रोजी गाडी क्रमांक 18520 लोकमान्य टिळक टर्मिनस विशाखापटनम म्हणून पुणे स्थानकावर आपल्या निर्धारित वेळेत धावेल.

3 ऑगस्ट रोजी प्रस्थान स्थानकावर न निघणारी गाडी क्र. 07617 नांदेड पनवेल एक्सप्रेस ही पुण्यात स्थानकापर्यंत धावेल. ही गाडी पुणे स्थानकावरून 4 ऑगस्ट रोजी गाडी क्रमांक 07618 पनवेल नांदेड एक्सप्रेस म्हणून धावेल.

2 ऑगस्ट गाडी 11020 पुणे शहर-मुंबई कोणार्क एक्सप्रेस ही पुण्यात स्थानकापर्यंत धावेल.

3 ऑगस्ट गाडी क्रमांक 17321 हुबळी लोकमान्य टिळक एक्सप्रेस दौंड स्थानकापर्यंत धावेल नंतर दौंड स्थानकावरून 4 रोजी गाडी क्र. 17322 लोकमान्य टिळक टर्मिनस हुबळी म्हणून आपल्या निर्धारित वेळेत सुटेल. 3 ऑगस्ट रोजी गाडी क्रमांक 17032 हैदराबाद-मुंबई एक्सप्रेस दौंड स्थानकापर्यंत धावेल ही गाडी कुर्डूवाडी स्थानकावरून 4 रोजी गाडी क्रमांक 12701 मुंबई हैदराबाद हुसेन सागर एक्सप्रेस म्हणून धावेल.

3 ऑगस्ट रोजी गाडी क्रमांक 11042 चेन्नई – मुंबई एक्सप्रेस पुणे स्थानकापर्यंत धावेल. ही गाडी पुणे स्थानकावरून 11027 मुंबई-चेन्नई एक्सप्रेस म्हणून 4 रोजी सुटेल, 3 ऑगस्ट रोजी गाडी क्रमांक 11302 बेंगलोर-मुंबई उद्यान एक्सप्रेस सोलापूर स्थानकापर्यंत धावेल, 3 रोजी गाडी क्रमांक 11014 कोईमतूर लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस पुणेपर्यंत धावेल ही गाडी पुणे स्थानकावरून गाडी क्रमांक 11013 लोकमान्य टिळक टर्मिनस कोईमतूर एक्सप्रेस म्हणून 4 तारखेला पुणे स्थानकावरून सुटेल, 4 रोजी गाडी क्रमांक 110 19 मुंबई-भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस पुणे स्थानकापर्यंत धावेल., 3 गाडी क्रमांक 163 32 त्रिवेंद्रम-मुंबई एक्सप्रेस दौंड स्थानकापर्यंत धावेल हीच गाडी दौंड स्थानकावरून 4 रोजी गाडी क्रमांक 16339 मुंबई-नागरकोईल एक्स्प्रेस म्हणून आपल्या निर्धारित वेळेत सुटेल.

🚆मार्ग परिवर्तन केलेल्या गाड्या

गाडी क्रमांक 11041 मुंबई-चेन्नई एक्सप्रेस वाया कर्जत शोरणुर, सेलम, आर्कोनम् मार्गे धावेल. गाडी क्रमांक 12 163 दादर चेन्नई एक्सप्रेस व्हाया कर्जत शोरणुर सेलम आर्कोनम् मार्गे धावेल. गाडी क्रमांक 163 81 मुंबई कन्याकुमारी एक्सप्रेस व्हाया कर्जत पनवेल रोहा मडगाव चोर मार्गे धावेल. गाडी क्रमांक 110 13 लोकमान्य टिळक कोईमतूर एक्सप्रेस व्हाया कर्जत शोरणुर सेलम आर्कोनम् मार्गे धावेल, गाडी क्रमांक 1 10 19 मुंबई भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस व्हाया कल्याण इगतपुरी मनमाड दौंड मार्गे धावेल, गाडी क्र, 11021 दादर एक्सप्रेस व्हाया कल्याण इगतपुरी मनमाड दौंड कुर्डवाडी मार्गे धावेल, गाडी क्रमांक 12701 व्हाया कल्याण इगतपुरी औरंगाबाद मार्गे धावेल, गाडी क्रमांक 22143 मुंबई-बिदर एक्सप्रेस व्हाया कल्याण इगतपुरी मनमाड औरंगाबाद मार्गे धावेल. गाडी क्रमांक 193 16 इंदोर लींगंपल्ली एक्सप्रेस व्हाया जळगाव मनमाड औरंगाबाद मार्गे धावेल.गाडी क्रमांक 16382 कन्याकुमारी मुंबई एक्सप्रेस वाया दौंड मनमाड इगतपुरी कल्याण मार्गे धावेल. गाडी क्रमांक 11013 लोकमान्य टिळक टर्मिनस कोईमतूर एक्सप्रेस व्हाया दिवा पनवेल रोहा मडगाव हुबळी गुंटकल मार्गे धावेल. गाडी क्र. 17018 सिकंदराबाद राजकोट एक्सप्रेस व्हाया दौंड मनमाड जळगाव सुरत मार्गे धावेल. गाडी क्रमांक12702 हैदराबाद मुंबई हुसेन सागर एक्सप्रेस व्हाया दौंड मनमाड इगतपुरी कल्याण मार्गे धावेल. गाडी क्रमांक 121 64 चेन्नई दादर एक्सप्रेस दौंड मनमाड इगतपुरी कल्याण मार्गे धावेल. गाडी क्रमांक 06051 चेन्नई आमदाबाद एक्सप्रेस व्हाया दौंड मनमाड जळगाव सुरत मार्गे धावेल.

या गाड्‍यांच्या वेळापत्रकात झालेला बदल लक्षात घेऊन प्रवाशांनी प्रवास करावा आणि रेल्‍वे प्रशासनास सहकार्य करावे असे सोलापूर रेल्‍वे विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: