खबर जगाची सकाळच्या सुपरफास्ट हेडलाईन!!
वृत्तसंकलन : गुरुराज माशाळ
श्रीनगर : भारतीय लष्कर प्रमुख बिपीन रावत सध्या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी रावत यांनी नियंत्रण रेषेवरून पाक व्याप्त काश्मीरमधील स्थितीचा आढावा घेतला.
नवी दिल्ली : देशात असलेल्या मंदीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. चांगल्या दिवसांचा भोंगा वाजवणाऱ्या सरकारने अर्थव्यवस्थेचे टायर पंक्चर केले आहे, असे प्रियांका गांधी यांनी टि्वटरवरून सरकारवर हल्ला चढवला आहे.
मुंबई : आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेनेतून केलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा शिवसेनेतील प्रवेश निश्चित मानले जात आहे. छगन भुजबळ आज मुंबईमध्ये शिवसेनेत प्रवेश करतील अशी चर्चा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत छगन भुजबळ यांचा शिवसेनेत प्रवेश होईल अशी बातमी काही प्रसार माध्यमांनी प्रसारित केले आहे.
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह इतर जिल्ह्यात पावसाने दांडी मारल्याचे दिसून आले आहे. मात्र हवामान खात्याने सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी, सांगली, सातारा आणि इतर जिल्ह्यात मुसळदार पावसाची शक्यता वर्तवला आहे.
पुणे : पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फ्लेक्सला शेण फासण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. देहूरोडमध्ये या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. भाजपचे कार्यकर्त्यांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. ही घटना तीव्र निषेधार्ह आहे, आरोपींना तातडीने अटक करा अशी मागणीही भाजपाने पोलिसांकडे केली आहे.
पुणे : कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, क्रीडा यांचा मनोहारी संगम असणाऱ्या ” ३१ व्या पुणे फेस्टिव्हल” चे उदघाटन शुक्रवार, दि.६ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते गणेश कला क्रीडा रंगमंच येथे होणार आहे.
पुणे : लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि भाजपचा संबंध कसा आहे हे सर्वांनी पाहिले आहे. मुख्यमंत्र्यांकडूनच वंचितला राज्यात वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल पुण्यातील काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
धुळे : केमिकल फॅक्टरीच्या स्फोटात 12 जणांचं होरपळून मृत्यू झाली आहे, तर 45हुन अधिकजण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 लाखांची मदत जाहीर केले आहेत.
जळगाव : राज्यातील बहुचर्चित तत्कालीन जळगाव नगरपालिकेच्या घरकुल घोटाळ्याचा निकाल काल धुळे जिल्हा व सत्र न्यायालयाने जाहीर केला. त्यात शिवसेनेचे माजीमंत्री सुरेश जैन यांना ७ वर्षे शिक्षा तसेच १०० कोटी रुपयांचा दंड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजीमंत्री गुलाबराव देवकर यांना ५ वर्षे शिक्षा तर ५ लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
वर्धा : माणूस जेव्हा संपत असतो तेव्हा धडपड करत असतो. आता शरद पवारांची अशीच परिस्थिती झाली असून त्यांची ही शेवटची धडपड आहे, अशी बोचरी टीका ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ते वर्ध्यात आयोजित जनता दरबारानंतर पत्रकारांशी बोलत होते.
सांगली : कृष्णा आणि वारणा नद्यांच्या महापुरात सांगली शहरासह जिल्ह्यातील १०४ गावांची प्रचंड मोठी हानी झाली आहे. महापुरात प्राथमिक पंचनाम्यानुसार तब्बल ७५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. केंद्रीय पथकाला या प्राथमिक नुकसानीचा अहवाल सादर करण्यात आल्याची माहिती, जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली.
सांगली : प्रत्येक पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी सरकारला भाग पाडू, त्यासाठी शेवटपर्यंत टोकाचा संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांना घेऊन सरकार विरोधात काल सांगलीमध्ये सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता यावेळी ते बोलत होते.
वाई : भाजपा आणि सेना युती होणारच आहे. आम्ही समन्वयातून जागांची अदलाबदल करणार आहोत. त्यामुळे माध्यमातून येणाऱ्या भाजप शिवसेना युती तुटणार या बातम्या खोट्या आहेत, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले.
सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप समारंभ आज सायंकाळी सोलापूरात होणार आहे. या समारोप कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्यातील विविध खात्याचे मंत्री उपस्थित राहणार असल्याने शहरात मोठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे. या मुळे इंदिरा गांधी स्टेडियमला पोलीस छावणीचा स्वरूप आले आहे.
सोलापूर : राज्य सरकारच्या पाच वर्षांतील कामांचा लेखाजोखा मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज सायंकाळी सहा वाजता सोलापुरात होत आहे. या निमित्त इंदिरा गांधी स्टेडियमवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
सोलापूर : रेल्वेतून विनातिकीत किंवा अनारक्षित डब्यातून आरक्षित डब्यात बसणार्या प्रवाश्यकडून रेल्वेला दंड स्वरूपात दरवर्षी सरासरी 500 कोटी रुपये मिळत आहेत मात्र प्रवाश्यांना दंडाची पावती नदेता तिकिटावर दंडाची रक्कम तिकीटावर लिहून तिकीट चेकर ते पैसे स्वत:च्या खिशात घालत असल्याने रेल्वेच्या महसुलात सुमारे 200 कोटींची घट झाल्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना थेट घरचा रस्ता दाखवण्याचा इशारा रेल्वे मंत्रालयाने दिला आहे.
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रेरणास्थान माजी मंत्री कै.आनंदराव देवकते यांच्या स्मारकासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी लोकवर्गणी म्हणून एक लाख रुपयांचा धनादेश दिला आहे. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राजूर गाव नावारूपाला यावे यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन सहकार मंत्री देशमुख यांनी केले.
सोलापूर : निवडणूकी पूर्वी भाजप सरकारने 72 हजार मेगाभरतीचे आश्वासन दिले होते. दिलेल्या आश्वासनाला पाच वर्षे पूर्ण झाली मात्र एकही तरुणाला नोकरी दिली नाही. आणखी किती दिवस या बेरोजगार तरुणांना फसवता असा सवाल माकपचे माजी आमदार आडम मास्तर यांनी केले आहे.
सोलापूर : वळसंग हद्दीतून प्रतिबंधीत 27 लाख रुपयांची गुटखा विक्रीसाठी नेत असताना सोलापूर जिल्हा अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप राऊत यांच्या मार्गदर्शना खालील विशेष पथकाने सापळा रचून पकडले आहे. याप्रकरणी 5 जणांविरुद्ध वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.