माणुसकीचेदर्शन 10 हजाराचे सापडलेले पाकीट पोलिसांकडे केले सुपूर्द

माणुसकीचेदर्शन 10 हजाराचे सापडलेले पाकीट पोलिसांकडे केले सुपूर्द

बार्शी: सध्याच्या काळात आपण माणुसकी आणि प्रामाणिकपणा संपत चालला असे म्हणत असलो तरी समाजात असे भरपूर प्रामाणिक लोक आहेत, त्याचा अनुभव बार्शी करांनी घेतला.

बंडू उर्फ नाना घाडगे राहणार उपळाई रोड हे सकाळी ९:३० च्या दरम्यान भाजीपाला आणण्यास गेले असता त्यांना रोडवरती लाल कलरचे लेदरचे पाकीट सापडले त्यामध्ये पैसे असलेले कळताच त्यांनी ते पाकीट बार्शी शहर पोलीस स्टेशन मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्याकडे सुपूर्त केले.

त्या पाकिटामध्ये 10 हजार 40 रुपये अशी रक्कम होती आशा भीषण परिस्थितीमध्ये सापडलेले पाकिट ते देखील पैसे असलेले पोलीस स्टेशनला सुपूर्त करून बंडू उर्फ नाना घाडगे यांनी आज माणुसकीचे दर्शन घडवून दिले.

व ते पाकीट मिरगणे कॉम्प्लेक्स शेजारी सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे कार्यरत असलेले बँकेतील कर्मचारी सुमित भंडारी यांचे असलेले कळताच पोलीस नाईक #अमोल माने यांनी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट साधून ते पाकीट त्यांना सुपूर्त केले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: