माझ्या बरोबर राज साहेब तुमचं पितळ उघड पाडणार,अविनाश जाधवांचा इशारा….!
मला अडकवण्याचा भरपूर प्रयत्न करण्यात आला. पण तरीही शेवटी सत्याचा विजय होतो हे आजसिद्ध झाले. असे कितीही खोटे गुन्हे दाखल झाले तरी आम्ही त्याला घाबरणार नाहीत. माझ्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज साहेब ठाकरे आहेत. तुमचं पितळ एका दिवशी उघडं पाडणार, असा ठणठणीत इशारा मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे.
जाधव यांना काल जामीन मंजूर झाल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचं तळोजा कारागृहाबाहेर जल्लोषाने स्वागत केले. त्यानंतर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना मुलाखत दिली. ठाण्यातील जे राजकीय नेते मला खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी प्रयत्न करत होते त्यांना माझी विनंती आहे, तुम्हाला काय संपवायचं आहे ते संपवा.
पण अडीशचे मुलींचं कुटुंब उद्ध्वस्त करु नका. तुम्हाला मी खुपसतो. मी जे खरंय ते लोकांसमोर मांडतो. तुम्हाला खरं ऐकायचं नसेल तर हरकत नाही. जर तसं करण्याचा प्रयत्न केला तर मी तुमच्या कुठल्याही केसेसला घाबरत नाही, असं अविनाश जाधव म्हणाले.