महिला आघाडी सक्षम करणार-रुपाली चाकणकर

पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर विश्वास दाखवला हा मला मिळालेला बहुमान आहे. सामान्य कार्यकर्त्यांचा हा बहुमान आहे. प्रामाणिक पणे काम करणाऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेहमीच न्याय मिळतो असे मत राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचीत प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी व्यक्त केले.

चाकणकर यांनी आजच महीला प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला. पक्षात काम करत असताना आव्हान असतात. काही लोक सोडून गेल्यामुळे फरक पडत नाही. गेली 11 वर्षे संघटनेचे काम केल्यामुळे कामाचा चांगला अनुभव आहे. त्याचा फायदा होईल. दोन दिवसात राज्यभर दौरा सुरू करणार आहे. वेगवेगळी आव्हान असतात त्याला सामोर जाण्यासाठी सदैव तप्तर राहील पाहिजे आणि मी हे आवाहन स्वीकारलं आहे. 12 तासाच्या आत राष्ट्रवादीने नवीन महिला प्रदेशाध्यक्ष दिला आहे.

सोडून गेले त्यांना जाऊदे त्यामुळे नवीन चेहऱ्यांना संधी देता येईल. आणि पक्ष वाढीस मदत होईल असे मत देखील त्यांनी व्यक्त केलं आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: