तब्बल अकरा वेळा विजयी झालेल्या ‘या’ ज्येष्ठ आमदाराची यंदाच्या निवडणुकीतून माघार

ग्लोबल न्युज नेटवर्क: लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र जोमाने विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघातून तब्बल अकरा वेळा विजयी झालेले शेतकरी कामगार पक्षाचे आमदार गणपतराव देशमुख यांनी यंदाची विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

वाचा काय आहे निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेण्याचे कारण

आमदार गणपतराव देशमुख यांनी प्रकृती अस्वास्थ्य आणि वाढत्या वयाच्या कारणामुळे मी विधानसभा लढवणार नसल्याचे नुकतंच त्यांनी स्पष्ट केले आहे.त्यांनी माघार घेतल्याने त्यांच्या जागी शेकापचे उमेदवार कोण असणार हा प्रश्न आहे.
गणपतराव देशमुख यांचे पुत्र व डिसीसी बँकेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत देशमुख,उद्योगपती भाऊसाहेब रुपनवर, जिल्हा परिषदेचे सदस्य सचिन देशमुख आदी गणपतराव देशमुखांचे उत्तराधिकारी होण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे या पैकी कोणाला उमेदवारी दिली जाणार हे पाहण्यासारखे राहणार आहे.

गणपतराव देशमुख यांनी राजकीय वाटचाल

🔹1962 ला त्यांनी सांगोल्यातून सर्वप्रथम निवडणूक लढली

🔹1978 मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापले त्यावेळी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश

🔹1999 मध्ये गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश

🔹2012 मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास 50 वर्षे पूर्ण झाल्याने सभागृहासह सरकारनेही त्यांचा गौरव केला होता.

दरम्यान गणपतराव देशमुख यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने माजी आमदार शहाजी पाटील यांना काहीसा फायदा होण्याची शक्यता ही नाकारता येणार नाही. शहाजी पाटील हे शिवसेनेत असून यावेळी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्याची शक्यता आहे. गतवेळी त्यांनी शिवसेनेतून निवडणूक लढून गणपतराव देशमुख यांच्यापुढे चांगले आव्हान उभा केले होते. तसेच याच शहाजी पाटील यांनी गणपतराव देशमुख यांचा १९९५ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढत अवघ्या १९२ मतांनी पराभव केला होता. गणपतराव देशमुख यांनी करुणानिधी यांचा विक्रम मोडीत काढला आहे. तसेच त्यांनी १९७८ आणि १९९९ साली स्थापन झालेल्या सरकारमध्ये मंत्रीपदे देखील भूषवली आहेत.देशमुख आणि शरद पवार यांच्यात ही सुरुवातीपासून जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा

ग्लोबल न्युज नेटवर्क: