महाराष्ट्रात सर्कस सुरु आहे हे पवारांनी मान्य केलं – चंद्रकांत पाटील

महाराष्ट्रात सर्कस सुरु आहे हे पवारांनी मान्य केलं – चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षाचे सरकार आहे. मात्र महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस होत असल्याची टीका केंद्रीय संरक्षण मंत्री आणि भाजपा नेते राजनाथ सिंग यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. महाराष्ट्र शासनाकडे ज्या प्रकारचे विकासाचे व्हिजन असायला पाहिजे ते बिलकुल दिसत नाही. अस देखील राजनाथ सिंग म्हणाले आहेत. भाजपाच्या महाराष्ट्र जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.

मात्र राजनाथ सिंग यांच्या टीकेला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल आहे. आमच्या सर्कसमध्ये प्राणी आहेत, पण विदुषकाची मात्र कमतरता आहे, या शब्दांत त्यांनी राजनाथ सिंहांचा खरपुस समाराच घेतला आहे. निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसललेल्या कोकणातील वादळग्रस्त भागाला भेट देण्यासाठी म्हणून पाहणी दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आता यावर माजी महसुल मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिल आहे. महाराष्ट्रात सर्कस सुरु आहे हे शरद पवारांनी मान्य केले आहे आणि त्या सर्कसमध्ये सर्व प्राणी आहेत हेदेखिल मान्य केलं असल्याची घणाघाती टीका चंद्रकांत पाटलांनी केली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: