महाराष्ट्रात मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करणारच – उद्धव ठाकरे

जेवढा विश्वास आमच्यावर आहे तेवढा अमित शहा आणि कंपनीवर नाही :उद्धव ठाकरे

मुंबई । मी स्वर्गाय बाळासाहेब ठाकरे यांना मी वचन दिले होते की, एक ना एक दिवस शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन. ते वचन पाळण्याची वेळ आता आली असून मुख्यमत्री हा सेनेचाच होईल असा विश्वास उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला. मी खोटं बोलणार नाही कारण मी काही भाजपवाला नाही, मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मला खोटं ठरवणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी बोलणार नाही. माझ्यावर खोटेपणाचा आरोप केला ते दुर्दैवी आहे. काळजीवाहूंनी असा काही प्रयत्न करु नये असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मी खोटेपणा केलेला नाही, भाजपा खोटेपणा करत आहे. सातत्याने भूमिका बदलण्याचा प्रकार भाजपाने केला आहे मी दिलेला शब्द फिरवलेला नाही. मातोश्रीवर जेव्हा अमित शाह आले होते तेव्हा जे काही ठरलं होतं ते देवेंद्र फडणवीस यांना ठाऊक आहे तरीही ते मला खोटं ठरवत आहेत असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

जे जमतं ते मी करेन तेच मी बोलेन, जे जमणार नसेल ते मी वेळ मारून नेण्यासाठी खोटं बोलणार नाही कारण मी भाजपवाला नाही आहे.

महाराष्ट्राच्या जनतेचा शिवसेनाप्रमुखांच्या परिवारावर जेवढा विश्वास आहे तेवढा अमित शहा आणि कंपनीवर नाही

हिंदुत्त्वाचा बुरखा घालून एखादा पक्ष खोटं बोलत असेल तर असे हिंदुत्त्व चालतं तुम्हाला

1999 साली भाजपने शिवसेनेसोबत येण्यास नकार दिला होता. त्यानंतर महिनाभराने आघाडीने

महाराष्ट्राच्या जनतेने ठरवावं की खरी बोलणारी लोकं हवी की खोट बोलणारी लोकं हवी. आमच्या घराण्याने कधीही खोटं बोलून काम केलेलं नाही. खोटं बोलणं आमच्या रक्तात नाही

मला आता संघाला विचारायचं आहे की खोटं बोलणारी माणसं तुम्हाला कशी चालतात. असा खोटारडेपणा हिंदुत्त्वात खपवून घेतला जात नाही.

लोकसभेच्या वेळी जे ठरलेलं त्यापेक्षा अधिक एका सुईच्य़ा टोकाइतकंही मला नको

मी शेतकऱ्यांसाठी मदत केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

370 कलम काढल्यानंतर त्यांचं उघड उघड अभिनंदन करणारं मी होतं

दुष्यंत चौटाला आणि उदयनराजे यांनी खालच्या थरावर जाऊन मोदींवर टीका केली त्यांच्यासोबत तुम्ही चर्चा करता याचं मला आश्चर्य वाटतं

मी शिवसेनाप्रमुखांना वचन दिलं आहे की मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर शिवसेनेचा माणूस मुख्यमंत्री म्हणून बसलेला दाखवीन आणि ते मी पाळणार म्हणजे पाळणारच. त्याच्यासाठी मला अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीची किंवा त्यांच्या आशीर्वादाची गरज नाही.

मी राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चा केलेली नाही

मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न काळजीवाहूंनी करू नये

राम मंदिर बांधायचं श्रेय तुम्ही घेऊ शकत नाही. कारण तो सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आहे.

शिवसेना प्रमुखांच्या खोलीत अमित शहा व माझ्यामध्ये जे ठरले आहे ते ते नाकारत असतील तर तुमच्या शब्दावर कुणाचा विश्वास नाही.

संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ आहे. शेतकरी संपूर्ण उद्धवस्त झालाय. पंचनामे सुरू आहेत. 15 दिवसात रब्बीचा मोसम सुरू होईल मात्र अद्याप शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही.

मला खूप वाईट वाटतं की नरेंद्र भाईंनी मला छोटा भाऊ म्हटलं पण यांना आमचं नातं डोळ्यात खुपतंय

मला खोटं ठरवणाऱ्या लोकांशी मी बोलणार नाही. असा खोटा रिश्ता मला ठेवायचं नाही.य

तुम्ही मला गुन्हेगार ठरवणारे कोण?

गोव्यात, मणिपूर, कर्नाटकमध्ये तुम्ही सरकार आणलं ते आम्हाला माहित आहे.

राम जसा सत्यवचनी होता तो जर रामाचा गुण आत्मसात करणार नसू तर कोणत्या तोंडाने रामाची पूजा करणार आहात.

मात्र गंगा साफ करता करता यांची मनं कलुषित झाली.

मला एका गोष्टीचं बरं वाटत होतं की दोन हिंदुत्त्व मानणाऱे पक्ष एकत्र आलं आहेत. झालं गेलं गंगेला मिळालं

सत्तेची लालसा एवढ्या खालच्या थराला जाईल असं वाटलं नव्हतं.

शब्द देऊन फिरवणारी वृत्ती आमची नाही.

मी मोदींवर टीका केलेली नाही. आज मोदींवर टीका करणारे उदयनराजे चालतात

साताऱ्याची जागा शिवसेनेला दिलेली ती उदयनराजेंसाठी सोडली ते विसरलात का

मी तुमची अडचण समजू घेतली हा माझा गुन्हा आहे का?

ते सगळं जनता बघतेय. त्यामुळेच विधानसभेत ही वाताहत झाली.

मी भाजपला शत्रूपक्ष मानत नाही. गेल्या पाच वर्षात ते सतत खोटं बोलत आहेत.

लोकसभेत पुन्हा आमच्या गळ्यात अवजड मंत्रीपद बांधण्यात आलं

चर्चा कधी होऊ शकते जेव्हा तुम्ही मुख्यमंत्रीपदावर बोलला असता

मी शिवसेनाप्रमुखांना वचन दिलं आहे की मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर शिवसेनेचा माणूस मुख्यमंत्री म्हणून बसलेला दाखवीन आणि ते मी पाळणार म्हणजे पाळणारच. त्याच्यासाठी मला अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीची किंवा त्यांच्या आशीर्वादाची गरज नाही.

महाराष्ट्राच्या जनतेसमोर शिवसेनाप्रमुखांचा मुलगा खोटं बोलतोय असं मी त्यांना दाखवू देणार नाही

पद आणि जबाबदारी यांच्या समसमान वाटप, पद म्हटल्यानंतर मुख्यमंत्री हे पद आहे की नाही? आणि मुख्यमंत्रीपद ही जबाबदारी आहे की नाही? आणि त्याचं समसमान वाटप हे नक्कीच ठरलेलं होतं

शब्दाचे खेळ कसे करतात, शब्द कसे फिरवतात हे आज मला कळलं

त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले होते की हे जर आता जाहीर झालं तर मला पक्षाअंतर्गत प्रॉ़ब्लेम होईल

आम्ही मुख्यमंत्रीपदाचं समसमान वाटप झालं हे ठरलं होतं

अमित शहा त्यानंतर मातोश्रीवर आले. त्यावेळी ते म्हणाले आता मला शिवसेनेसोबतचे संबंध सुधारायचे आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी युतीची चर्चा सुरू असताना माझ्यासमोर प्रस्ताव आला की उपमुख्यमंत्रीपद तुम्हाला मिळेल, मी म्हटलं उपमुख्यमंत्रीपदासाठी युती करण्याएवढा मी काही लाचार नाही. त्यामुळे मी चर्चा थांबविली व निघून आलो

अमित शहा, देवेंद्र फडणवीस आले. युतीची चर्चा थांबली होती त्याचेही कारण मी होतो.

दुर्दैवाने मला हा शब्द वापरावा लागतोय की देवेंद्र फडणवीसांनी अमित शहांचा संदर्भ घेऊन माझ्यावर खोटेपणाचा आरोप केलाय. मी देवेंद्रजींना सांगू इच्छितो, अमित शहा आणि कंपनीने कितीही आमच्यावर खोटेपणाचा आरोप केला तरी जनता पुरेपूर ओळखून आहे की खोटे कोण बोलतो आणि सत्य कोण बोलतो

मला एका गोष्टीचं दुःख झालं की शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीय, शिवसेनाप्रमुखांचा परिवार, या परिवारावर म्हणजे माझ्यावर पहिल्यावर कोणीतरी खोटारडेपणाचा आरोप केला आहे.

पाच वर्षात जनतेच्या हिताचे प्रश्न मांडले. त्यावेळी सरकारमध्ये सामिल असूनही मी सरकारविरोधात भांडलो.

आम्ही जो शब्द देतो तो विचार करून लाख वेळा विचार करून देतो.

आम्ही जर भाजपसोबत नसतो तर ते विकासकामं करू शकले असते का

ग्लोबल न्युज नेटवर्क: