मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे. आता देशात एकूण पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोना व्हायरस झपाट्याने वाढत आहे. मुंबईतील रुग्णांची संख्या 74 झाली आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 74 झाली आहे. शनिवारपर्यंत ही संख्या 64 वर होती. आज 10 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले. यामध्ये 6 मुंबई आणि 4 पुण्याचे रुग्ण आहेत. आज कोरोना बाधीतांमधील एका रुग्णाचा मृत्यू एचएन रिलायन्स रुग्णालय मुंबईमध्ये झाला.
मृत रुग्ण हा 56 वर्षांचा होता. ही व्यक्ती 21 मार्चला रुग्णालयात दाखल झाली होती. आता महाराष्ट्रात दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशभरात 5 जणांचे बळी गेले आहेत.