“महाराष्ट्राच्या राजकारणातील खणखणीत नाणं”- पंकजाताई गोपीनाथ मुंडे

सामर्थ्याने महाराष्ट्राच्या राजकारणाची परिभाषा बदलणारे उमदे नेतृत्व-पंकजाताईं गोपिनाथराव मुंडे

लेख मंगेश गीते-अंबाजोगाई..

सत्तेत असताना जनतेच्या महत्वकांक्षाना सीमा नसते,प्रत्येक गोष्टी किंवा इच्छा सत्तेत असताना पूर्ण होतीलच असे नसते, पण काहीप्रमाणात पूर्ण झालेल्या गोष्टींमध्येच आपल्या सर्वांचे समाधान असले पाहिजे हा विश्वास एखाद्या चिरकाल टिकवावयाच्या नेतृत्वावर जनतेने ठेवणे अपेक्षीत आहे..!

पंधरा वर्षाच्या आघाडी सरकारच्या कालखंडात भ्रष्टाचाराने भरभटलेल्या राजकारणाला तिलांजली देत पंकजाताईंच्या सरकारने राजकारणाची व्याख्या बदलली.भ्रष्टाचाराने गंजलेल्या ग्रामविकास खात्याचे पंकजाताईंच्या परिस स्पर्शाने सोने तर झालेच,एवढेच नाहीतर या खात्यामार्फत राबवलेल्या प्रत्येक योजणेमुळे जनमानसांचे देखील सोने झालेले आहे.
खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंकजाताईंबद्दल काढलेले गौरवोदगार हीच ताईंच्या ग्रामविकास खात्या मार्फत करण्यात आलेल्या कामांची पावती आहे..!

भारताच्या पुरूषप्रधान संस्कृतीमध्ये एखाद्या स्त्रीने राजकीय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणे हे ठराविकच महिला नेत्यांना जमले आहे.त्यापैकी,एक नाव म्हणजे महाराष्ट्राच्या ग्रामविकास मंत्री पंकजाताई गोपीनाथ मुंडे.लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या अपघाती मृत्युनंतर देशांसह राज्याचा राजकारणात पंकजाताई फक्त सक्रीय झाल्या नाहीत तर संपूर्ण राजकिय क्षेत्रावर आपला ठसा उमटवला.२०१४च्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान संपुर्ण राज्यभरातून ‘पुन्हा संघर्ष यात्रा’ काढत भाजपा व शिवसेनेचे सरकार आणण्यामध्ये आपला सिंहाचा वाटा निर्माण केला.त्यानंतर,पंकजाताईंना महिला व बालकल्याण आणि ग्रामविकास खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली.

पंकजाताईंनी विरोधकांच्या जातीपातीच्या राजकारणाला फाटा देत विकासाचे राजकारण करण्यास प्राधान्य दिले.फक्त बीड जिल्हात नाही तर संपूर्ण राज्यात विविध योजना राबवत रस्ते,वीज,जलसंधारण,महिला व बाल कल्याण,ग्रामपंचायत सरंपचांची निधीवाढ असो की अंगणवाडी सेविकेचा प्रश्न ताईंनी ताबडतोब सोडवले.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून पंकजाताई मुंडे यांच्या खात्याकडून अनेक दिवसांपासून रखडलेली प्रत्येक खेड्यावाडीवस्तांमधील रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत.पंकजाताईच्या या विकासकन्येच्या प्रवासामध्ये अनेक अडथळे निर्माण करण्याचे काम केले.परंतू,पंकजाताईंनी डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून विकासकामे करून दाखवून विरोधकांचे तोंड कायमचे बंद करून पंकजाताई सर्वांना पुरून उरल्या.

स्वाभिमानाशी तडजोड न करता निर्माण केलेले अस्तित्व जपण्यासाठी अविरत संघर्ष करावा लागत असतो.
साहेबांचे वारसदार म्हणून पदरात पडलेल्या गोर,गरीब,वंचित तसेच ऊसतोड मजुरांच्या पालकत्वाची जिम्मेदारी व्यवस्थितरित्या पार पाडण्यामागे खरचं खूप मोठ्या संघर्षाचा भाव असतो..!

पाऊलोपाऊली निर्माण झालेल्या संकटाच्या झळा आपल्या झोळीतील जनतारुपी लेकरांना लागू नयेत त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत आयुष्याच्या वाटेवरची सर्व दुःखे बाजूला करुण,सतत अग्रेसर राहत राजकारणातील व जनतेच्या मनातील सर्वोच्च स्थानी विराजमान होण्याकरिता प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते..!

ऊसतोड कामगारांच्या प्रस्थापित प्रश्नांना मार्गी लावत ताईंनी ऊसतोड कामगारांच्या भविष्याला सुरक्षित करणाऱ्या प्रभावी मागण्या मान्य करत ऊसतोड मजुरांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ऐतिहासिक क्षण सुवर्ण अक्षरात लिहिला..!

पंकजाताईंनी दुष्काळाने होरपळलेल्या भागांना भेटी देऊन तेथील शेतकऱ्यांमध्ये दुष्काळाशी दोन हात करण्याचं बळ निर्माण करून दिले. दुष्काळात नेहमी जनतेच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहत, दुष्काळामुळे झालेली नुकसानभरपाई शेतकऱ्यांना वेळोवेळी मिळवुन देत पंकजाताईंनी स्वतःची कार्यकुशलता सिद्ध करून दाखवलेली आहे..!

मुंडे साहेबांची शिकवण आत्मसात करून पंकजाताईंनी भुतो ना भविष्य असे विकासपर्व संपूर्ण राज्यात राबवलेले आहे..!

पंकजाताईंनी सामान्य माणसांचा विकास हेच ध्येय नजरेसमोर ठेऊन मिळालेली सत्ता विचारपूर्वक लोकहितार्थ वापरण्यासाठीची पराकाष्ठा केली..!

विकासाचे धोरण,प्रगतीचे नियोजन करताना व्यापक समाजकारण हे ध्येय नजरेआड होऊ दिले नाही..
पंकजाताईंनी स्वतःला,समाजाला व पक्षाला तात्विक नैतिक अधिष्ठान दिले कार्यकर्त्यांना ध्येयवाद दिला यातूनच राजकारणातील सर्व शिखरे त्यांनी सर केली..!

संघर्ष करण्याचा स्वभाव,सर्वधर्मसमभाव,इतरांच्या मताचा आदर करण्याची व सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती,प्रेमळ स्वभाव,उत्तम प्रशासकीय गुण,नेतृत्व कौशल्य,मुंडे साहेबांचे संस्कार.
यासर्व गुणांच्या आधारे पंकजाताईंनी स्वसामर्थ्यावर स्वतःचे व्यक्तिमत्व व नेतृत्व सिद्ध करून दाखवले आहे..!

“उद्धिष्ठापासून विचलित न होता जे मिळतं ते पुढं घेऊन जाण्याचा स्वभाव असल्यानं प्रमुख ध्येयावर लक्ष केंद्रित करून एका पाठोपाठ एक निर्णय घेण्यात आणि त्याची अंमलबजावणी करण्यात पंकजाताईं यशस्वी झालेल्या आहेत”..

कोणत्याही प्रकारच्या टिकेला प्रतिउत्तर न देता स्वतःच्या राजकीय वाटचालीत अग्रेसर राहत जनतेच्या विकासासाठी कार्य करत राहणे या साहेबांच्या विचारसरणीला अनुसरून पंकजाताई स्वतःची राजकीय वाटचाल करत आहेत..!
राजकीय क्षेत्रात वावरणारांच्या दृष्टिकोणात अशी मूलभूत तफावत असेल तर त्यातून विधायक दृष्टिकोणाचा पाठपुरावा करणाराला कोंडीत पकडून नेस्तनाबूत करण्यासाठी व्यवहारिक राजकारणी टपून बसलेले असतात!!… 
असे राजकारणी लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करून देण्याच्या कामात आघाडीवर असतात. पंकजाताई गैरसमजाचे बळी ठराव्यात यासाठी अनेकदा प्रयत्‍न करण्यात आले.

दृष्टिकोणात तफावत असल्या कारणाने ताईंवर कठोर टीका करण्यात आल्या त्यांचा अवमान करण्यात आला, निंदानालस्ती करण्यात आली. विश्वासाला तडा जाईल असे काही बनावट प्रसंग उभे करण्यात आले.
राजकारणातील अन्य एखाद्या माणसाचा या टीकेनं चोळामोळा झाला असता पण टीकेचा कर्तृत्वावर व मनावर कसलाच परिणाम ताईंनी होऊ दिला नाही..।

टिकांचा अपवाद वगळता चालू काळातील उत्तम, कार्यक्षम आणि लोकाभिमुख राजकीय प्रशासक म्हणून त्यांनी केलेले कार्य निर्विवाद आहे.

“प्रवाहाच्या विरोधात जाऊन संघर्ष करण्याची धमक वाघाच्या पोटी जन्म घेतलेल्या वाघिणीच्याच अंगात असते”..!

महाराष्ट्राच्या राजकारणात दैदिप्यमान ताऱ्याप्रमाणे झळकणाऱ्या मुंडे साहेबांच्या लेकीला, महाराष्ट्राच्या वाघिणीला, बहुजनांच्या लाडक्या पंकजाताईंना वाढदिवसाच्या अनंत अनंत शुभेच्छा..!

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी व Filmy Marathi चे फेसबुक पेज
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा

ग्लोबल न्युज नेटवर्क: