महायुती बाबत मुख्यमंत्र्याचे मोठे वक्तव्य, चार आमदारांनी केला भाजपात प्रवेश

आज भाजपमध्ये मोठ्याप्रमाणात विरोधीपक्षातील नेत्यांनी प्रवेश केला असला तरी आमची युती अभेद्य आहे. आम्ही विधानसभा निवडणुका ‘महायुती’तूनच लढवणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्यात पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युतीचे सरकार निवडून आणू हे जनतेने ठरवलेले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांच्या महायुतीला प्रचंड मोठं जनसमर्थन मिळताना दिसेल, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधीपक्षांना दणका देत माजी मंत्री मधुकर पिचड, वैभव पिचड, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार कालिदास कोळंबकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या चित्रा वाघ अशा बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना-भाजप युती अभेद्य असल्याचे ठामपणे सांगितले.

शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांनी लोकसभा निवडणुका या एकत्र लढल्या. विधानसभा निवडणुका देखील आम्ही महायुतीतच लढणार आहोत. यात जागांच्या बोलणी संदर्भात पुढील 10-15 दिवसांत निर्णय घेतले जातील. काही आमच्या जागा त्यांना जातील, त्यांच्या आम्हाला येतील, तो निर्णय आम्ही एकत्र येऊन घेऊ. पण आम्ही महायुती म्हणूनच ही निवडणूक लढवणार आहोत, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. संपूर्ण महाराष्ट्राचा जनादेश हा युतीच्या पाठीश आणू. महाराष्ट्रात विकास घडवून आणू. त्यासाठीच मी जनादेश यात्रेवर निघणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: