मुख्यमंत्री व आदित्य ठाकरे यांच्या यात्रानंतर आता राष्ट्रवादीची अमोल कोल्हेंच्या नेतृत्वात शिवस्वराज्य यात्रा


6 ऑगस्टपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेला सुरूवात, दुसरा टप्पा 16 ऑगस्टपासून तुळाजापूरमध्ये

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आणि आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आता शिवस्वराज्य यात्रा काढणार आहे. महत्त्वाचं म्हणजे शिवस्वराज्य यात्रेची धुरा खासदार शिरूर चे नूतन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. याशिवाय खासदार उदयनराजे भोसले हे देखील या शिवस्वराज्य यात्रेत ठिकठिकाणी स्टार कॅम्पेनर म्हणून सहभागी होणार आहेत. शिवस्वराज्य यात्रेला 6 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.

सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या कथित फोडाफोडीच्या व खच्चीकरणाच्या राजकारणाला जोरदार प्रत्युत्तर देण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसनं सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रव्यापी ‘शिवस्वराज्य’ यात्रा काढणार आहे. लोकप्रिय अभिनेते व राष्ट्रवादीचे शिरूर मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे या यात्रेचं नेतृत्व करणार असून साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यात्रेचे स्टार प्रचारक असणार आहेत.

6 ऑगस्टपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेला सुरूवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात 3 मतदारसंघांमध्ये ही यात्रा काढण्यात येणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीपासून म्हणजेच जुन्नर येथून या सभेला सुरूवात होणार आहे. पहिल्या टप्प्याची सांगत जिजाऊंच्या जन्मस्थानी म्हणजेच सिंदखेडराजा या ठिकाणी होणार आहे.

शिवस्वराज्य यात्रेचा दुसरा टप्पा 16 ऑगस्टपासून तुळाजापूर येथून होणार आहे. तर या यात्रेची सांगता रायगडावर होणार आहे. या यात्रेची जबाबदारी युवक राष्ट्रवादी काँग्रेसकडे सोपवण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या खांद्यावर या यात्रेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा

ग्लोबल न्युज नेटवर्क: