महायुतीची झाली घोषणा, नारायण राणेंचा भाजप प्रवेशाचे काय होणार?

मुंबई । संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या शिवसेना भाजपा युतीची घोषणा अखेर करण्यात आली. संयुक्त पत्राद्वारे महायुतीची घोषणा करण्यात आली आहे.

महायुतीची घोषणा जरी करण्यात आलेली असली तरी जागावाटप मात्र जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे कोणता पक्ष किती जागा लढवणार हे गुलदस्त्यात आहे. महायुतीतील सर्व मित्रपक्षांच्या प्रमुखांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रसिद्धि पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

या पत्रकावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

दरम्यान, महायुती झाल्याने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग आता बंद झाला आहे. शिवसेनेने राणेंच्या प्रवेशाला विरोध केल्याने त्यांना आतापर्यंत प्रवेश देण्यात आला नव्हता. युती तुटली तर राणेंना प्रवेश द्यायचा अशी रणनीती भाजपने आखली होती.

मात्र, युती झाल्याने राणेंना स्वबळावर लढावे लागणार आहे. गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशावरही शिवसेनेने नाराजी प्रकट केली होती. त्यामुळे राणेंना प्रवेश देऊन शिवसेनेला न दुखविणे भाजपने पसंत केल्याचे बोलले जात आहे.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: