मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार औसामधून निवडणुकीच्या मैदानात

मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार औसामधून निवडणुकीच्या मैदानात

लातूर : राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीतचं मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

अभिमन्यू पवार हे औसा विधानसभा मतदारसंघातून लढणार अशी चर्चा होती. मात्र आता पक्षाने पवार यांच्यावर विश्वास दाखवत औसा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली असल्याचं दिसत आहे.

अभिमन्यू पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातले आहेत. गेले अनेक दिवस अभिमन्यू पवार औसा विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची तयारी करत होते. सुरुवातीला लातुर ग्रामीण मधून तयारीला लागलेल्या पवारांनी आता मात्र औसा विधानसभेवरच अधिक लक्ष केंद्रित केले आहे.

लातूर ग्रामीण देशमुख परिवाराचा गड मानला जातो, त्याभागात असलेल्या त्यांच्या कारखान्यांमुळे शेतकरी वर्ग त्यांना मोठ्या प्रमाणात जोडला गेलेला आहे.त्यामुळे तिथे गेल्या निवडणुकीत आलेल्या मोदी लाटेचाही निभाव लागू शकला नाही. त्या कारणानेच पवार औसा विधानसभा मतदारसंघाकडे वळले असल्याचे बोलले जात आहे. अभिमन्यू पवारांनी जरी हा मतदार संघ निवडला असला तरी या ठिकाणचा मार्ग त्यांना म्हणावा तितका सोपा नाही.

दरम्यान औसा विधानसभा मतदारसंघात गेल्या २ निवडणुकीत प्रमुख लढत कॉंग्रेसचे विद्यमान आमदार बसवराज पाटील आणि शिवसेनेचे माजी आमदार दिनकरराव माने यांच्यामध्ये झाली होती. आमदार बसवराज पाटील येण्यागोदर या मतदार संघाचे १० वर्ष प्रतिनिधित्व शिवसेनेचे दिनकरराव माने यांनी केले आहे. मात्र मागील काही दिवसांमध्ये ते जिल्ह्याच्या म्हणता तालुक्याच्या राजकारणापासून थोडेसे लांब राहिलेले आहेत.त्यामुळे राज्यातील लक्षवेधी लढतीमध्ये या लढतीचा समावेश होणार असणार आहे.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: