महात्मा बसवेश्वरांचे विचार आणि वचनांच्या साहित्याचा अभ्यास ही काळाची गरज:अरविंद जत्ती,बसव संदेश यात्रेचे बार्शीत स्वागत

गणेश भोळे
बार्शी: कर्नाटक राज्यात बसविण्यात येणाऱ्या १५ फुट उंचीच्या महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याची आणि त्यांच्या विचार साहित्याची महाराष्ट्राच्या १६ जिल्ह्यांतून व तालुक्यांतून बसव संदेश यात्रा सुरू आहे. सुमारे चार हजार किलोमीटर अंतर आणि २२ दिवसांच्या या प्रवासातील रविवारी बार्शी येथे आगमन होताच नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले.
यावेळी माजी राष्ट्रपती बी.डी.जत्ती यांचे चिरंजीव अरविंद जत्ती, अविनाश भोसीकर, ज्येष्ठ साहित्यीक डॉ.सूर्यकांत घुगरे, बाळासाहेब आडके, विरूपाक्ष वांगी, विवेकानंद देवणे, राहुल झाडबुके, राजा झाडबुके, राजाभाउ लुंगारे, विवेक वायकर, अॅड.विकास जाधव, पंकज शिंदे, पिंटू माळगे, विठ्ठल गुडे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशांत घोडके, प्रविण थळकरी, गोपाळ साखरे, किरण तोडकरी, राहुल नांदेडकर, शशिकांत दसंगे, अॅड.संकेत लकशेट्टी, सोमनाथ होनराव, उमेश अक्कलकोटे, पंकज लकशेट्टी, प्रविण गाढवे, आनंद सुपेकर, प्रविण घोटाळे, अनिल चाबुकस्वार, अंकुश नान्नजकर, विक्रमसिंह पवार, गिरीष नायकोजी, स्वप्नील नेवाळे, समर्थ सुरवसे, गणेश आलमलकर, सुजित दहिहांडे, शुभम शेटे यासह वीरशैव लिंगायत समाजाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
याप्रसंगी बोलतांना ज्येष्ठ साहित्यीक अरविंद जत्ती म्हणाले, महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकात जे अाधुनिक विचार मांडले त्याचा समाजाला आजपर्यंत उपयोग होत आहे. त्यांनी स्थापन केलेल्या अनुभव मंटपात अनुभवावरील आधारित वचनांचे विविध १४ भाषेत भाषांतर झाले आहे. महात्मा बसवेश्वरांच्या वचनांवर अनेकांना डॉक्टरेट मिळाली असल्याने त्यांच्या विचारांचे महत्व आज अधोरेखीत होतांना दिसून येत आहे. वीरशैव लिंगायत समाज हा विविध पोटजातींत विभागलेला आणि देशभर विखुरलेला समाज आहे. अनेक राज्यांत समाज बांधवांच्या भेटीगाठीचा प्रसंग आल्यानंतर शेकडो वर्षांच्या वैचारिक परंपरा संस्क्रतीला धोका निर्माण होतोय की काय अशी भिती निर्माण झाली आहे. महात्मा बसवेश्वरांचे विचार आणि वचनांच्या साहित्याचा अभ्यास ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले.

धिरज करळे: