मराठा सेवा संघाचे  पुरस्कार जाहीर : शरद ठाकरे, डॉ.विजय अंधारे, अशोक भोसले, डॉ मीरा सुर्यवंशी-ढेंगळे, अमोल शिंदे मानकरी 

मराठा सेवा संघाचे  पुरस्कार जाहीर 

शरद ठाकरे, डॉ.विजय अंधारे, अशोक भोसले, डॉ मीरा सुर्यवंशी-ढेंगळे, अमोल शिंदे मानकरी 

 सोलापूर: मराठा सेवा संघ वर्धापन दिनानिमित्त सोलापूर जील्हा शाखेच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या समाज बांधवाना दिला जाणार्‍या  मराठा रत्न  पुरस्कार यंदाच्या वर्षी शरद ठाकरे, डॉ.विजय अंधारे, अशोक भोसले, डॉ मीरा सुर्यवंशी-ढेंगळे, नगरसेवक अमोल शिंदे यांना दिले जाणार असल्याची माहिती मराठा सेवा सघाचे जिल्हाअध्यक्ष प्रशांत पाटील यांनी दिली.

  बुधवार 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.00 वा. शिवस्मारक सभागृहात  पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी बृहनमुंबई मराठा सेवा संघाचे अध्यक्ष तथा बृहनमुंबई  महानगर पालिकेचे कार्यकारी अभियंता नवनाथ घाडगे असणार आहेत तर बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संतोष शेलार यांची प्रमुख उपस्थिती  असणार आहे .

 मराठा समाज प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असणारा व ग्रामिण भागात वास्तव्य असणारा समाज आहे. अशा परिस्थितीमधून सर्वसामान्य कुटुंबात मोजक्या साधनांवर शिक्षण घेऊन   प्रतिकुल परिस्थितीचा सामना करत, स्पर्धेला सामोरं जात अनेक जण यशोशिखरापर्यंत पोहचतात. अशा काही समाज बांधवाचा प्रातिनिधीक यशवंताचा सन्मान केला जाणार आहे. या समाजबंधवाचा आदर्श  नव्या पीढीसमोर यावा  यातून प्रेरणा मिळावी म्हणून  या प्रतिवर्षी हा गौरव सोहळा केला जातो. 

 यंदा   यशस्वी उद्योजक म्हणून लक्ष्मी हायड्रोलिक्सचे शरद ठाकरे, वैद्यकीय क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीबद्दल हृदयरोग तज्ञ डॉ.विजय अंधारे, प्रशासकीय सेवेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल इंजिनिअर अशोक भोसले, कृतीशिल महीला म्हणून वैराग येथिल साई शिक्षण संकुलच्या प्रमुख डॉ.मीरा सुर्यवंशी – ढेंगळे पाटील तर अष्टपैलू युवक म्हणून मराठा नागरी पतसंस्थेचे चेअरमन व नगरसेवक अमोल शिंदे या पंचरत्नांचा समावेश आहे.

 सदर प्रेरणादायी सोहळ्यास समाज बांधव व भगिनींनी उपस्थित रहावे असे अवाहन मराठा सेवा संघाचे.जी.के देशमुख, संजय जाधव, दत्ता मुळे, निर्मला शेळवणे, सोमनाथ राऊत, तानाजी चटके, आर पी पाटील, दिनकर देशमुख , डॉ. राजलक्ष्मी गायकवाड, नंदा शिंदे यांनी केले आहे.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: