मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी जातीचा दाखल मोफत मिळणार,बार्शीत सकल मराठा समाजाचा उपक्रम

धीरज करळे

बार्शी – सकल मराठा समाज आणि राजाभाऊ राऊत मित्र मंडळाच्यावतीने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोफत जातीचा दाखल काढून देण्यात येत आहे. केवळ संबंधित कागदपत्रांची पूर्तता केल्यास, विद्यार्थ्यांना थेट जातीचा दाखलाच काही दिवसांनी हातात मिळणार आहे. शिवाजी महाविद्यालयातील संत तुकाराम हॉलमध्ये विद्यार्थ्यांना सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कागदपत्रांची पुर्तता करण्याचे आवाहन सकल मराठा समाज आणि राजाभाऊ राऊत मित्र मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

भाजपा नेते राजेंद्र राऊत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांसाठी मोफत जात प्रमाणपत्र मदत केंद्र शिबिराचे उद्घाटन होणार आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांची जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी होणारी हेळसांड आणि विद्यार्थ्यांना होणार त्रास लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेच, तहसिल कार्यालयात मारण्यात येणाऱ्या चकराही वाचणार आहेत.

विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्रासाठी येणारा सर्व खर्चही स्वतः राजाभाऊ राऊत यांच्याकडून केला जाणार आहे. त्यामुळे SEBC (मुख्यत्वे मराठा समाज) प्रवर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यायला हवा. तसेच, संबंधित मित्र मैत्रीण आणि नातेवाईकांनाही याबाबत सांगायला हवे. 6 जुलै ते 6 ऑगस्ट असे तब्बल 1 महिन्यासाठी हे शिबिर राबविण्यात येणार आहे. त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांची अकरावीची प्रवेशप्रक्रिया सोपी व सोपस्कर होईल. यासाठी नारायणराव जगदाळे, दिलीप सुरवसे, महेश देशमुख, नगरसेवक मदन गव्हाणे परिश्रम घेत आहेत.

या कागदपत्रांची आवश्यकता

आवश्यक कागदपत्रे – शाळा सोडल्याचा दाखला,
वडिल/चुलते/आत्या/आजोबा यांचा शाळा सोडल्याचा दाखला
1967 पूर्वीचा मराठा जात नमुद पुरावा आवश्यक.
प्रतिज्ञापत्र अर्जदाराचे आधारकार्ड ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठीचे फेसबुक पेज लाईक करा.
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा

ग्लोबल न्युज नेटवर्क: